मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खानची लोकप्रियता इतकी प्रचंड आहे की त्याला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्याच्या चाहत्यांची संख्या लाखोंनी आहे. तो दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर आपला चित्रपट प्रदर्शित करतो. त्याचे चाहतेही वर्षभर त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. सलमानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉलिवूडचा हा 'दबंग' अभिनेता आता एका सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये सलमान मुख्य भूमिका साकारणार असून कथा वाचून त्याने चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अत्यंत गाजलेल्या 'मास्टर' चित्रपटाच्या हिंदी रिमेकसाठी सलमानला विचारणा करण्यात आली होती. मूळ तमिळ चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार याने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडले होते. लॉकडाउननंतर प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट असूनही त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाचं हिंदीत डबिंगदेखील करण्यात आलं होतं. चित्रपटाची संपूर्ण भारतभर जोरदार चर्चा होती. 'कबीर सिंग' चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी आणि एंडेमॉल शाईन या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. चित्रपटात विजय याने साकारलेली भूमिका किंवा सुपरस्टार यांनी साकारलेली बडाई भवानी ही भूमिका, यापैकी कोणतीही एक भूमिका सलमानने करावी यासाठी चित्रपटाचे निर्माते गेला महिनाभर त्याच्या मागे लागले होते. अखेरीस सलमानने त्यांच्या विनंतीला मान देत त्यांना त्याचा होकार कळवला आहे. बॉलिवूडमध्ये रिमेक बनवताना चित्रपटामध्ये काही बदल करावेत, असं सलमानने त्यांना सुचवलं आहे. आता सलमान लवकरच या चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. सलमानचा 'राधे- द मोस्ट वॉन्टेड भाई' चित्रपट १३ मे रोजी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dBWO9N