मुंबई: तुझं माझं ब्रेकअप मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री नेहमीच तिच्या स्टायलिश लुक आणि डान्स व्हिडिओंमुळे चर्चेत असते. पण नुकताच एक तिनं एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांसोबत खास गोष्ट शेअर केली आहे. मीरानं एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे. जगातील सर्वात उंचीवर असलेल्या शिव मंदिरात मीरानं नृत्य आराधना करण्याचा विक्रम केला आहे.मीरानं ही खास बातमी चाहत्यांसोबत शेअर केल्यानंतर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. उत्तराखंड राज्यात रुद्रपयाग इथं असलेलं तुंगनाथ शिवमंदिर हे जगातील सर्वात उंचीवर असलेलं शंकराचं मंदिर आहे. या मंदिरासमोर नृत्य आराधना करणारी मीरा ही पहिली अभिनेत्री ठरली आहे. मीराच्या नृत्य आराधनेची नोंद 'हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' आणि 'इंडिया रेकॉर्ड्स'मध्ये झाली आहे.मीरानं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तिनं या विक्रमाबद्दलचा अनुभव शेअर केला आहे. तिनं हा विक्रम करण्यासाठी ज्या -ज्या लोकांनी मदत केली त्या सर्वांचे आभार मानले आहेत. मीराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'वृत्ती' या आगामी मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3umV1vZ