मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे व्यायाम करतानाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यासोबतच ती तिच्या कुटुंबासोबतचे फोटोदेखील चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिच्या मुलांसोबतचे आणि पतीसोबतचे काही फोटो पोस्ट केले होते. त्यावर काही युझर्सनी अत्यंत वाईट शब्दात कमेंट केली. परंतु, अभिनेत्रीनेही त्यांना प्रत्युत्तर देत चांगलाच धडा शिकवला. मंदिराला वीर नावाचा एक मुलगा आहे. २०२० मध्ये तिने आणखी एका मुलीला दत्तक घेतलं होतं. तिचं नाव त्यांनी असं ठेवलं. परंतु, तारासोबतचे फोटो टाकताच काही युझर्सनी अत्यंत घाणेरड्या प्रतिक्रिया दिल्या. एका युझरने लिहिलं, 'मॅडम, तुम्ही कोणत्या झोपडपट्टीतून तुमच्या मुलीला दत्तक घेतलंय?' तर दुसऱ्या युझरने लिहिलं, 'त्या दत्तक मुलीला तुमच्या घरात खूप वेगळं वाटत असेल. तुम्ही प्रतिष्ठेची हाव असणारे लोक त्या झोपडपट्टीमधल्या मुलीला आयुष्यभरासाठी घाबरवताय.' हे सगळं पाहून मंदिराचा रागाचा पारा चढला आणि तिनेही या ट्रोलर्सना त्यांच्याच शब्दात उत्तर दिलं. मंदिराने पहिल्या युझरला उत्तर देताना म्हटलं, 'अशा लोकांकडे जास्त लक्ष द्यायची गरज असते आणि अभिनंदन तुम्ही माझं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झालात. निव्वळ एक कचरा.' तर दुसऱ्या युझरला उत्तर देताना तिने लिहिलं, 'एक सभ्य म्हणवून घेणारा नागरिक जो स्वतःला राजेश त्रिपाठी म्हणून हाक मारतो. जे त्याचं नाव नक्कीच नाहीये. कारण अशा मानसिकतेची लोकं खूप घाबरट असतात. त्यांना फक्त पाठीमागून आपली ओळख लपवून जीभ चालवता येते.' मंदिराने अशा तिखट शब्दात त्यांचा समाचार घेतला आहे. मंदिराने १९९९ साली राज कौशलसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर १२ वर्षांनी त्यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यानंतर त्यांनी एका २०२० साली एका मुलीला दत्तक घेतलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uIaYgr