Full Width(True/False)

ए काकू! तू घातलंस तरी काय? नेटकऱ्यांनी सोनम कपूरला केलं ट्रोल

मुंबईः बॉलिवूडमधील फॅशन क्विन म्हणून हिच्याकडे पाहिले जाते. तिचा ग्लॅमरस अंदाज आणि फॅशन सेन्स हा इतरांपेक्षा एकदम हटके असतो. असे जरी असले तरी अनेकदा सोनमचा हा फॅशन सेन्स असा काही विचित्र असतो की त्यामुळे तिला नेटकरी तुफान ट्रोल करत असतात. आता पुन्हा एकदा सोनमला अशाच वाईट पद्धतीने नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. इतकेच नाही तर तिने जे कपडे घालून फोटोशूट केले आहे, ते पाहून नेटकरी म्हणतात, 'काकू, तू नेमकं घातलंस तरी काय?' नेटकऱ्यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी संजय लीला भन्साळी यांच्या 'सावरियाँ' सिनेमातून बॉलिवूडमध्ये सोनमने पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक सिनेमे केले परंतु त्यातील अभिनयापेक्षा तिच्या विविध आऊटफिटमधील फोटोशूटसाठीच ती चर्चेत राहिली. अलिकडेच सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एका मासिकाच्या कव्हरपेजसाठी केलेल्या फोटोशूटचे फोटो पोस्ट केले आहेत. यावेळी तिने जे काही कपडे घातले आहेत, ते पाहून काही नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावला, तर काहींना तिची खिल्ली उडवली. या फोटोमध्ये सोनमने ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनचे कपडे घातले असून डोळ्यावर मास्कही लावला आहे. ते पाहून एका नेटकऱ्याने सोनमला तू कबूतरासारखी दिसते असे म्हटले आहे. तर आणखी एकजण म्हणतो 'हे असं कुणी घालतं का... छी.' दुसरा नेटकऱ्याने लिहिले की 'अरे देवा! हे नेमकं आहे तरी काय?' एक नेटकरी तर म्हणतो, “काकू, हे तुम्ही नेमकं कोणत्या डिझाइनचे कपडे घातले आहेत?”, दुसरा नेटकरी म्हणाला, “गरूडाचे रूप घेतलेस का?” सोबतच सोनमला एका नेटकऱ्याने “वल्गर” म्हटलं आहे. दरम्यान, सोनम या लूकमध्ये एकदमच हॉट दिसत आहे. यावरून इंडस्ट्रीमधील अनेक लोकांनी मात्र सोनमची स्तुती केली आहे. याआधी अनेकदा झाली ट्रोल सोनम कपूर या आधीही तिच्या विचित्र आऊटफिटमुळे ट्रोल झाली आहे. सुरुवातीला ती ट्रोल करणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायची परंतु आता ती या ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करते. या ट्रोलिंगबाबत तिला एका मुलाखतीमध्ये विचारले असता तिने सांगितलं की, 'मला काय घालायचे आणि काय नाही हे समजतं. त्याबाबत माझे स्वतःचे असे ठाम विचार आहेत. त्यामुळे कुणीही मी काय घालावे आणि काय घालू नये हे सांगण्याची अजिबात गरज नाही. मी अशा लोकांची अजिबात पर्वा करत नाही.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cHcwRI