Full Width(True/False)

बर्थडेच्या दिवशी काजोलने हात जोडून केली 'ही' विनंती; अजय म्हणाला...

मुंबई ः बॉलिवूडमधील अभिनेता आणि निर्माता याचा ५२ वा वाढदिवस आहे. बॉलिवूडमधून आणि त्याच्या चाहत्यांकडून अजयवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या सर्व शुभेच्छांमध्ये त्याची बायको हिने देखीलत्याला शुभेच्छा देत त्याला हात जोडून एक विनंती केली आहे. काय म्हणाली काजोल काजोल हिने तिच्या सोशल मीडियावर अजयचा एक फोटो पोस्ट करत त्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा ही दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना काजोलने खास तिच्या स्टाईलमध्ये अजयची मस्करी केली आहे. काजोल लिहिते की, 'अजयबरोबर एक सेल्फी घेण्याचा मी प्रयत्न करत होते, परंतु तो आजही कामात असल्याने मला त्याच्याबरोबर सेल्फी घेता आला नाही. अखेर मला अजयबरोबर असलेल्या कॅमे-याबरोबरच त्याचा फोटो घ्यावा लागला...अर्थात काम करताना तो सर्वात जास्त आनंदी असतो...त्याला वाढदिवसाच्या खूप सा-या शुभेच्छा...' अजयने दिले उत्तर काजोलच्या या पोस्टवर अजयनेही लगेच उत्तर दिले. त्यात तो म्हणतो, ' आपण लवकरच एक सेल्फी घेऊ या...' त्याबरोबर त्यांनी नमस्काराचा इमोजी पोस्ट केला आहे. अजय शांत स्वभावाचा अलिकडेच अजयने एका मुलाखतीमध्ये त्याला जाहीरपणे वाढदिवस साजरा करायला आणि केक कापायला का आवडत नाही हे सांगितले होते. त्याच्यामते तो अतिशय कौटुंबिक वृत्तीचा असल्याने जाहीरपणे असे समारंभ करायला आवडत नाही. काजोल आणि अजय यांचे १९९९ साली लग्न झाले. बॉलिवूडमधल्या लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांनी इश्क, प्यार तो होना ही था, तान्हाजी या सिनेमांत एकत्रकाम केले होते. अजयचे सिनेमे दरम्यान, वाढदिवसाचा मुहूर्तावर अजयच्या आगामी 'आरआरआर' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले असून त्यात अजय व्यतिरीक्त राम चरण, ज्युनिअर एनटीआर आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sKRSWv