Full Width(True/False)

अभिनेत्रीने मोडलं ठरलेलं लग्न, नवऱ्यावर होते अत्याचाराचे आरोप

मुंबई- '' चित्रपटात इरफान खान यांच्या पत्नीची भूमिका साकारणारी पाकिस्तानी अभिनेत्री हिने तिचं ठरलेलं लग्न मोडलं आहे. याबद्दल तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच सबाने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं होतं की ती नावाच्या व्यक्तीसोबत लग्न करत आहे. त्यानंतर तिने त्यांच्या साखरपुड्याची घोषणा देखील केली होती. परंतु, आता सबाने पोस्ट करत हे लग्न मोडल्याचं जाहीर केलं आहे. तिच्या या पोस्टने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. सबाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करत ही घोषणा केली आहे. तिने लिहिलं, 'मी एक खूप महत्वाची घोषणा करत आहे. काही वैयक्तिक कारणांमुळे मी अजीम खानसोबत होणारं माझं लग्न मोडतेय. आता आम्ही लग्न करणार नाही. तुम्ही सगळे माझ्या प्रत्येक निर्णयात जसे पाठीशी असता तसाच पाठिंबा आताही दाखवाल अशी मी आशा करते. वाईट गोष्टींची ओळख पटायला वेळ लागत नाही. मला आणखी एक महत्वाचं सांगायचं आहे ते म्हणजे, मी माझ्या आयुष्यात कधीही अजीम खानला भेटले नाही. आम्ही फक्त फोनच्या माध्यमातून एकमेकांशी बोलायचो. ही माझ्यासाठी खूप वाईट वेळ आहे, पण ही वेळदेखील निघून जाईल.' सबाच्या या पोस्टवर चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. महत्वाचं म्हणजे अजिमने सबाच्या या पोस्टवर ही माझी चूक आहे, म्हणत प्रतिक्रिया देखील दिली आहे. अजीम खान हा एक ब्लॉगर आणि एक व्यावसायिक आहे. सबासोबत साखरपुड्याची घोषणा होताच त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. त्याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत स्वतःची बाजू मांडण्याचा प्रयत्नदेखील केला होता. त्यावर सबाने त्याची बाजू घेत त्याला पाठिंबा दिला होता. सबाने तिचं लग्न मोडण्यामागचं कारण सांगितलं नसलं तरीही अजीमवर लागलेले हे गंभीर आरोप त्यांचं लग्न मोडण्याचं कारण असू शकतं अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3duJTGq