नवी दिल्लीः Flipkart Big Saving Days: फ्लिपकार्टने आपल्या पुढच्या सेलची घोषणा केली आहे. फ्लिपकार्टवरचा हा सेल २ मे ते ७ मे पर्यंत चालणार आहे. ग्राहकांना या सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक आणि अन्य दुसऱ्या सामानावर डिस्काउंट, एक्सचेंज ऑफर आणि नो कॉस्ट ईएमआय मिळणार आहे. Flipkart च्या म्हणण्यानुसार, आगामी सेल Apple, Vivo, Asus आणि Xiaomi च्या फ्लॅगशीप ऑफर्सचे प्रमुख स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करता येऊ शकतील. इलेक्ट्रॉनिक आणि अॅक्सेसरीज वर ८० टक्के सूट आणि टेलिविजन सेट आणि डिव्हाइसवर ७५ टक्के सूट देण्यात येणार आहे. दुसऱ्या कॅटेगरीवर सुद्धा डिस्काउंट दिला जाणार आहे. यात कपडे, किराना, फर्निचर आणि अन्य सामानांचा समावेश आहे. वाचाः क्रेझी डील्स सेक्शन, मोबाइल टीव्ही, आणि लॅपटॉप वर रोज १२ वाजता, सकाळी ८ वाजता आणि सायंकाळी ४ वाजता नवीन डिल असणार आहे. तसेच दुपारी २ वाजता सर्वात कमी किंमतीची डिल असणार आहे. फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेल साठी एक नवीन मायक्रोसाइट तयार करण्यात आली आहे. वेब पेज नुसार स्मार्टफोनवर सेल सूट, बँक कार्डवर अतिरिक्त सूट, नो कॉस्ट ईएमआय पर्याय सोबत एक्सचेंज डिल्स असणार आहे. जाणून घ्या या सेलसंबंधी... वाचाः १. Apple iPhone 11 सध्याची किंमत ५४ हजार ९०० रुपये आहे. फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेलमध्ये हा फोन ४४ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकतो. २. ५५ हजार ९९९ रुपये किंमतीचा आसुस आरओजी फोन ३ फो ४६ हजार ९९९ रुपयात खरेदी करता येऊ शकतो. ३. सेलमध्ये अधिक पॉकेट फ्रेंडली डिस्काउंट दिला जाणार आहे. ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या iQOO 3 स्मार्टफोनला २४ हजार ९९० रुपयांत खरेदी करता येऊ शकते. Xiaomi चा Mi 10T २७ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवाती किंमतीत खरेदी करता येऊ शकतो. ४. बिग सेविंग डेज सेल दरम्यान फ्लिपकार्ट सॅमसंग गॅलेक्सी एफ१२ ला ९ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येऊ शकते. ५. सॅमसंग गॅलेक्सी एफ ४१, ६ जीबी प्लस ६४ जीबी स्टोरेजला १२ हजार ४९९ रुपये तर १२८ जीबी स्टोरेजला व्हेरियंटला १४ हजार ४९९ रुपयांत उपलब्ध केले जाणार आहे. सॅमसंग गॅलेक्सी एफ ६२ ला १७ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. ६. स्मार्टफोन आणि गॅझेट शिवाय, दुसऱ्या डिव्हाइसवर सुद्धा सूट दिली जाणार आहे. यात मायक्रोसाइट हेडफोन आणि स्पीकर वर ७० टक्के, प्रोसेसर आणि ग्राफिक्स सारख्या कंप्यूटरवर ६० टक्क्यांपर्यंत तसेच टॉप ब्रँडसच्या लॅपटॉपवर ४० टक्क्यांपर्यंत सूट मिळण्याचे संकेत आहेत. ७. या सेलमध्ये एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय देवाण-घेवाणवर १० टक्के तात्काळ सूट दिली जाणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32U21Vr