Full Width(True/False)

आशुतोष राणांनंतर रेणुका शहाणे आणि दोन्ही मुलंही करोना पॉझिटिव्ह

मुंबई- देशभरात सुरू असलेली करोनाची दुसरी लाट अत्यंत गंभीर स्वरूप धारण करत आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत वाढ होते आहे. बॉलिवूडमध्येही अनेक कलाकरांना करोनाची लागण झाली आहे. सध्या लॉकडाउनमुळे चित्रपटांचं चित्रीकरण बंद असलं तरीही करोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढते आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेते यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं होतं. परंतु, त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनाही करोनाची लागण झाल्याचं समजतंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाची सौम्य लक्षणं दिसू लागल्याने आशुतोष राणा यांच्या पत्नी आणि त्यांची मुलं शौर्यमान आणि सत्येंद्र यांनीही करोनाची चाचणी केली होती. शनिवारी संध्याकाळी त्यांच्या चाचणीचा रिपोर्ट आला असून ते तिघेही पॉझिटिव्ह असल्याचं कळलं होतं. त्यानंतर घरातील सगळ्यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतलं आहे आणि आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी आशुतोष यांनाही करोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांनीही स्वतःला क्वारंटाईन करून घेतलं होतं. आशुतोष आणि रेणुका यांनी स्वतःला करोनाची पहिली लस टोचून घेतली आहे. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला काळजी घेण्याची विनंती केली आहे. गेल्या काही दिवसातच अनेक बॉलिवूड कलाकारांना करोना झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यात अर्जुन रामपाल सोबतच समीरा रेड्डी, नितिन मुकेश, सोनू सूद, मनीष मल्होत्रा आणि सुमित व्यास यांचा समावेश आहे. त्यापूर्वी अक्षय कुमार, आमिर खान, गोविंदा, कतरीना कैफ, विकी कौशल, आलिया भट्ट, रणबीर कपूर आणि संजय लीला भंसाली यांनादेखील करोनाची लागण झाली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ebngr5