मुंबई : कलाकार आणि त्यांचे चाहते हे समीकरण एकदम वेगळेच असते. आपल्या लाडक्या कलाकारांसाठी त्यांचे चाहते काय करतील याचा काहीच नेम नसतो... असाच अनुभव बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री हिला आला आहे. तिचा एका चाहता तिला भेटण्यासाठी चक्क औरंगाबादहून थेट मुंबईला आला आणि ते देखील या लॉकडाऊनच्या काळात... नोराच्या या चाहत्याने केलेल्या पराक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. करोनाच्या संकटकाळामध्ये आपल्या आवडत्या अभिनेत्रीला भेटण्यासाठी हा फॅन चक्क औरंगाबादहून थेट मुंबईत दाखल झाला. मुंबईत आल्यानंतर त्याने थेट मुंबई विमानतळावर नोराला भेटायला गेला. तिथे त्याला पाहून नोरा देखील हैराण झाली. नोराला समोर पाहून या चाहत्याने त्याच्या हातावर नोराचा चेह-याचा गोंदवलेला तिला दाखवला. ते पाहून नोराला देखीलआश्चर्य वाटले आणि ती म्हणाली, 'छान आहे! हा टॅटू पाहून मी माझ्या आत्म्याशीच बोलत आहे असे मला वाटले... तुमचा टॅटू छान आहे.' त्यानंतर त्याने नोरासाठी खास केक आणला होता आणि तिने तो कापावा अशी विनंती त्याने तिला केली. आपल्या या चाहत्याचा मान राखत नोराने विमानतळावरच केक कापला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. नोराने माधुरीसोबत केला झक्कास डान्स अलिकडेच नोराने डान्स दिवाने ३ कार्यक्रमात स्पेशल जज म्हणून हजेरी लावली होती. त्यावेळी तिने माधुरी दीक्षीत सोबत डान्स केला होता.या दोघींच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अलिकडेच या दोघींचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यामध्ये त्या दिलबर या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दरम्यान जॉन अब्राहमच्या सत्यमेव जयते सिनेमात नोराने दिलबर ट्रॅकवर शानदार डान्स करत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यानंतर कमरिया, ओ साकी साकी आणि गरमी यांसारख्या गाण्यावर डान्स करून नोराने स्वतःची खास ओळख तयार केली आहे. त्याचबरोबर गेल्यावर्षी श्रद्धा कपूर,वरुण धवन यांच्यासोबत ती स्ट्रीट डान्सर ३ या सिनेमातही दिसली होती.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Sh8VCd