मुंबई : बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे . सोशल मीडियावर सक्रीय असलेला हा अभिनेता अनेक कारणांमुळे सातत्याने चर्चेत असतो. मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये कार्तिकने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यावेळी कार्तिकने त्याचे कोणत्या कारणाने झाले याचा खुलासा केला. हे ऐकून तुम्हांलाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. या मुलाखतीमध्ये कार्तिकने सांगितले, 'मलाही होती. अनेक वर्षे आम्ही दोघेही रिलेशनमध्ये होतो आणि आमचे हे रिलेशनबद्दल आम्ही सिरीअसही होतो. परंतु माझे अभिनेता होऊन मनोरंजन विश्वामध्ये येणे तिला मान्य नव्हते. मला अभिनयातच करीअर करायचे होते. अखेर माझ्या अभिनयाच्या या पॅशनमुळे अखेर आमचे ब्रेकअप झाले.' याच मुलाखतीमध्ये त्याला विचारले होते की सध्या तो कोणाला डेट करत आहे, त्यावर कार्तिकने उत्तर दिले की, 'सध्या मी सिंगल असून कोणालाही डेट करत नाही.' दरम्यान, कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, अलिकडेच निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या 'दोस्ताना २' मधून कार्तिकला बाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या बातमीनुसार २०१९ मध्येच आर्यनने हा सिनेमा स्वीकारला होता. तेव्हा त्याने या सिनेमाच्या मानधनपोटी २ ते ३ कोटीच्या आसपास मानधन मागितले होते. त्यानंतर त्याची मार्केट व्हॅल्यू वाढल्याने मानधन वाढवून मागितले होते. त्यावर करण जोहरने त्याचे हे वागणे व्यवसायाला धरून नसल्याचे सांगत त्याला या सिनेमातून काढून टाकले. इतकेच नाही तर 'मिस्टर लेले' या आगामी सिनेमातूनही कार्तिकला काढून टाकले. तसेच धर्मा प्रॉडक्शनने त्याला बॅन केले आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PyVtIP