Full Width(True/False)

नागार्जुनचा फिटनेस केलं हैराण! रश्मिका मंदानाला दिलं चॅलेन्ज

मुंबई- दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार यांनी स्वतःचे साम्राज्य उभे केले आहे. त्यांच्या चाहत्यांची संख्याही कोट्यवधींच्या घरात आहे. असा हा सुपरस्टार ६० व्या वर्षीदेखील फिटनेसबाबत कमालीचा जागरूक आहे. आपला फिटनेस आणि आगामी सिनेमाचे प्रमोशन यांची उत्तम सांगड घालत त्यांनी सोशल मीडियावर सिंगल पुशअपचा एक व्हिडीओ शेअर केला. हा व्हिडीओ शेअर करत त्यांच्या सिनेमातील अभिनेत्री हिला चॅलेंज दिले आहे.नागार्जुन यांनी हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अगदी थोड्याच वेळात तो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री रश्मिका मंदाना हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर वाईल्ड डॉग पुश अप चॅलेंज स्वीकारले होते आणि तो व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओही खूपच व्हायरल झाला होता. याच कारणामुळे नागार्जुन यांनी रश्मिकाला सिंगल पुशअप चॅलेंज दिले आहे. हे चॅलेंज देताना त्यांनी लिहिले की, 'रश्मिका, तुला हे करून दाखवत हरवायलाच हवे...' नागार्जुन यांनी पोस्ट केलेल्या दीड मिनिटांच्या या व्हिडीओच्या माध्यमातून नागार्जुन यांनी त्यांचा आगामी सिनेमा 'वाइल्ड डॉग' याचे प्रमोशन केले आहे. आपल्या सिनेमाचे प्रमोशन करण्याचा नागार्जुन यांचा हा अनोखा आणि मनोरंजक असा मार्ग त्यांच्या चाहत्यांनाही आवडला आहे. कमालीचा फिटनेस! दरम्यान, हा व्हिडीओ ज्यांनी ज्यांनी पाहिला, त्यांना नागार्जुन यांच्या फिटनेसपाहून आश्चर्य वाटले. नागार्जुन ६० वर्षांचे आहेत, परंतु त्यांची पिळदार शरीरयष्टी, त्यांचा फिटनेस आणि त्यासाठी त्यांची समर्पण वृत्ती कोणालाही प्रेरणा देणारी आहे. नागार्जुन यांचे आगामी सिनेमे नागार्जुन यांचा 'वाइल्ड डॉग' हा आशिशोर सोलोमन यांनी दिग्दर्शित केला आहे. या सिनेमात दिया मिर्झा आणि सयामी खेर या अभिनेत्री आहेत. हा सिनेमा २ एप्रिलला रिलीज होणार आहे. तर रश्मिका आता किर्थी याच्यासोबत 'सुल्तान' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाद्वारे रश्मिका तमिळ सिनेमात पदार्पण करत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mdiZGW