Full Width(True/False)

मराठी चित्रपटात काम करायला आवडेल का? अभिषेक बच्चन म्हणतो...

संपदा जोशी ० '' या चित्रपटातल्या भूमिकेची तयारी कशी केलीस?- दिग्दर्शकानं जे आणि जसं सांगितलं मी त्याबद्दल काहीही न विचारता तसं करत गेलो. संहितेत जे लिहिलं होतं तेच केलं. चित्रपटाच्या संपूर्ण टीमनं खूप मेहनत घेतली आहे. ० हा चित्रपट '' वेब सीरिजशी मिळताजुळता आहे, अशी सोशल मीडियावर चर्चा आहे, तुझं यावर काय मत आहे?- चित्रपट कशाशी मिळताजुळता आहे हे महत्त्वाचं नाही. प्रेक्षकांना चित्रपटाबद्दल काय वाटतंय हे त्यांनी चित्रपट बघून ठरवावं. माझ्यासाठी प्रेक्षकांचं म्हणणं महत्त्वाचं आहे. ० ओटीटी (ओव्हर द टॉप) या माध्यमाबद्दल काय वाटतं?- ओटीटीच्या माध्यमातून कलाकाराला त्याचं काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळते. लॉकडाउनमध्ये चित्रपटगृहं बंद होती आणि अजूनही ते पूर्णपणे सुरू झालेले नाहीत. अशा परिस्थितीत ओटीटी या माध्यमामुळे आम्ही कलाकार प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतो, ही चांगली बाब आहे. ० करोनानंतर चित्रपटगृहं अस्तित्वात राहतील का की त्यांची जागा ओटीटी हे माध्यम घेईल?- जेव्हा टीव्ही, डिव्हीडी वगैरे बाजारात आले होते तेव्हादेखील आपण असाच विचार केला होता. पण इतर माध्यमं असतानाही प्रेक्षकांनी चित्रपटगृहांत जाणं बंद केलं नाही. आपल्याकडे चित्रपटगृहांची परंपरा आहे. ती तशीच टिकून राहील. 'तुम्ही चांगले चित्रपट तयार करत रहा. चांगलं काम करत रहा. प्रेक्षक ते नक्की बघणार. मग ते चित्रपटगृहात जाऊन असो, ओटीटीवर असो किंवा टीव्हीवर असो; पण प्रेक्षक तुमचं काम बघणार', यावर माझा विश्वास आहे. ० गेल्या तीन-चार वर्षांत तुझ्यातल्या कलाकाराला दुर्लक्षित केलं गेलं असं तुला वाटतं का ?- मी या गोष्टीशी अजिबात सहमत नाही. आयुष्यात आपल्याला जे मिळायला हवं ते मिळतंच यावर माझा विश्वास आहे. जेवढी मेहनत करू तेवढंच फळ मिळतं. मी बाकी कोणत्या गोष्टी मानत नाही. मी ज्यासाठी पात्र होतो ते ते मला मिळत गेलं. ० मराठी कलाकार आणि मनोरंजनसृष्टीबद्दल तुला काय वाटतं?- गेल्या काही वर्षांमध्ये मराठी मनोरंजनसृष्टीत अमुलाग्र बदल घडून आले आहेत. 'सैराट' चित्रपटानंतर कोणालाही मराठी चित्रपटाची ताकद लक्षात येईल. मराठी कलाकार आणि मनोरंजनसृष्टी नेहमीच आशयघन चित्रपट तयार करते. मराठी कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभवही सुरेख असतो. ० तुला मराठी चित्रपटात काम करायला आवडेल का?- मी याबद्दल कधी विचार केला नाही. पण चांगली संहिता मिळाली तर मराठी चित्रपटात काम करायला मला नक्कीच आवडेल.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xbQgaE