Full Width(True/False)

म्हणून इच्छा असूनही बाबिल इरफानच्या आठवणी शेअर करत नाही

मुंबई : कॅन्सरविरोधात प्रदीर्घ काळ संघर्षानंतर हरहुन्नरी अभिनेता यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने हिंदी सिनेसृष्टी एका गुणी कलाकाराला मुकली आहे. इरफान जरी हयात नसले तरी चाहत्यांच्या मनात ते आजही आहेत. इरफान यांचा मुलगा आपल्या वडिलांच्या काही आठवणी सोशल मीडियावर शेअर करायचा. परंतु काही दिवसांपासून बाबिलने वडिलांच्या आठवणी सोशल मीडियावर पोस्ट करणे सोडून दिले आहे. हे आपण का करत नाही यामागचे कारणही त्याने सांगितले आहे. हे आहे मूळ कारण इरफान गेल्यानंतर बाबिल त्यांच्या आठवणी सोशल मीडियावर पोस्ट करत होता. ते इरफान यांच्या चाहत्यांनाही आवडते होते. परंतु अचानक बाबिलने आठवणी पोस्ट करणे थांबवले. ते पाहून एका युझरने त्याला विचारले तू आता इरफान यांच्या आठवणी का शेअर करत नाही. त्यावर बाबिलने जे उत्तर दिले ते ऐकून सगळ्यांना धक्काच बसला. बाबिलने सांगितले, 'मला बाबांच्या आठवणी तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करणे खूप आवडत होते. परंतु या साऱ्या आठवणी मी स्वतःचे प्रमोशन करण्यासाठी करत आहे, असे मेजेस वारंवार येऊ लागले. यामुळे मला खूप वाईट वाटले. मी खूप दुखावलो गेलो. माझा असा काहीच उद्देश नव्हता. बाबांच्या चाहत्यांना केवळ त्यांची उणीव भासू नये, त्यांच्या काही आठवणी चाहत्यांना कळाव्यात या उद्देशाने मी हे पोस्ट करायचो. परंतु या प्रतिक्रिया आल्यामुळे मी आता गोंधळून गेलो आहे की नेमके आता काय करू. मी सर्वप्रथम त्यांचा मुलगा आहे, त्यांच्या नावाचा वापर करून मला प्रसिद्धी मिळवायची नाही. आता योग्य वेळ आल्यानंतरच मी त्यांच्या आठवणी तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करणार आहे.' इरफान खान यांचे निधनानंतर बाबिलने त्यांच्या आठवणींचे फोटो, व्हिडीओ पोस्ट केले होते. हे सारे इरफान यांच्या चाहत्यांना आवडत होते. ते तशा प्रतिक्रियाही देत होते. दरम्यान, बाबिल देखील बॉलिवूडमध्ये येत आहे. त्याने अभिनय केलेली 'काला'हा सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या सिनेमात बाबिलसोबत तृप्ती डिगरी दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती अनुष्का शर्माच्या प्रॉडक्शन हाऊसने केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3swYBlN