मुंबई : अभिनेता याच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेंड या ना त्या कारणाने सातत्याने चर्चेत असते. सुशांतच्या मृत्यूप्रकरणी सुरू असलेल्या प्रकरणाच्या चौकशी दरम्यान रियाला अनेकवेळा त्रासही सहन करावा लागला होता. इतकेच नाही तर काही दिवस तिला जेलमध्येही रहावे लागले होते. लोकही उलटसुलट चर्चा करून तिला दूषणे देत होती. त्यामुळेच अनेक दिवस रिया सोशल मीडियापासूनही लांब असल्याने तिने एकही पोस्ट केली नव्हती. आता रिया पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रीय होत आहे. अलिकडेच तिने एक फोटो पोस्ट केला आहे काय आहे फोटोत रिया चक्रवर्तीने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला. त्यामध्ये रिया रवींद्रनाथ टागोर यांचे प्रसिद्ध पुस्तक 'गीतांजली' वाचताना दिसत आहे. या फोटोमध्ये रियाने पिवळ्या रंगाचा कुर्ता घातला असून चेहऱ्यावर कोणताही मेकअप नाही. पुस्तक वाचतानाचा हा फोटो पोस्ट करत रियाने या पुस्तकातील ' एक प्रश्न आणि एक खेद म्हणजे 'ओह' आणि 'कुठे' पाण्याच्या हजारो धारा अश्रूंमध्ये विरघळून गेल्या आणि आश्वासनांच्या पुराने जगाला कवेत घेत सांगितले, 'मी आहे.' रवींद्रनाथ टागोर यांच्या, गीतांजली' या पुस्तकाहील या काही ओळी तिने इन्स्टावर पोस्ट केल्या आहेत. रियाने पोस्ट केलेल्या या फोटोवर तिच्या मित्रमंडळींनी कमेंट केल्या आहेत. त्यामध्ये शिबानी दांडेकर आणि सिद्धांत कपूर यांचा समावेश आहे. रिया चक्रवर्तीच्या या पोस्टवर काही नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. एक युझर लिहितो, 'कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना... 'तर दुसऱ्याने लिहिले, 'आयुष्याला सकारात्मक पद्धतीने जगण्याचा तुझा प्रयत्न पाहून छान वाटत आहे. तुला खूप शुभेच्छा...' रियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर 'चेहरे' या सिनेमात तिने काम केले आहे. या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, इम्रान हाश्मी, अन्नू कपूर, रघुबीर यादव प्रमुख भूमिकेत आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन रुमी जाफरी यांनी केले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3t6I4pM