नवी दिल्लीः साउथ कोरियाची कंपनी एलजीने नुकताच दोन स्क्रीनच्या स्मार्टफोन लाँच केला होता. आता कंपनीने आपल्या स्मार्टफोनचा बिझनेस बंद करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या स्मार्टफोनवर मोठा डिस्काउंट देण्यात येत आहे. वाचाः LG Wingला तुम्ही ४० हजार रुपयांच्या डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता. कंपनी स्मार्टफोन बनवणे बंद करणार असली तरी या फोनसोबत ३ वर्षाचे अपडेट कंपनीकडून दिले जाणार आहे. तसेच आफ्टर सेल सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. LG Wing ला गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात लाँच करण्यात आले होते. लाँच दरम्यान, स्मार्टफोनची किंमत ६९ हजार ९९० रुपये होती. फ्लिपकार्ट फ्लॅगशीप सेलमध्ये आज म्हणजेच १२ एप्रिल पासून सुरूवात होणार असून हा सेल १५ एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे. वाचाः Flipkart Flagship Sale च्या दरम्यान LG Wing स्मार्टफोन ग्राहकांना फक्त २९ हजार ९९९ रुपयांना खरेदी करता येऊ शकतो. या स्मार्टफोन मध्ये Qualcomm Snapdragon 765G चिपसेट दिला आहे. यात दोन डिस्प्ले दिले आहेत. या फोनमध्ये ८ जीबी रॅम सोबत १२८ जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे. फ्लिपकार्टवर नोटिफाय मी चा ऑप्शन पाहिला जाऊ शकतो. फोनला फ्लिपकार्टवर लवकरच उपलब्ध केला जाणार आहे. या फोनमध्ये ६.८ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स, १३ मेगापिक्सलचा वाइड अँगल लेन्स आणि १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स दिला आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3g7GXT5