मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं ११ जानेवारी रोजी मुलगी वामिकाला जन्म दिला. त्यानंतर काही महिन्यांनी अनुष्का पुन्हा कामावर परतली आहे. या दरम्यान तिची एक जुनी मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तिनं म्हटलं, होतं मला माहीत आहे मी एक चांगली आई होईन आणि त्याचं कारण असेल . पण अनुष्कानं असं का म्हटलं होतं. घेऊयात जाणून... अनुष्का शर्मानं तिचा चित्रपट 'बॉम्बे वेलवेट'च्या प्रमोशनच्या वेळी एक मुलाखत दिली होती. त्यावेळी तिनं, रणबीर कपूरसोबत राहून राहून मला एवढं प्रशिक्षण मिळालं आहे की मी चांगली आई होऊ शकते असं म्हटलं होतं. रणबीरचं लहान मुलांसारखं वागणं पाहूनच मी स्वतःला बाळाला सांभाळण्यासाठी ट्रेन केलं आहे असंही अनुष्कानं यावेळी सांगितलं होतं. एका मुलाखतीत अनुष्का म्हणाली होती, 'रणबीरला सर्वकाही जाणून घ्यायचं असतं. तो माझ्या मेकअप रुममध्ये येतो आणि त्यातील ड्रॉव्हर उघडायला सुरुवात करतो. माझी हॅन्डबॅग उघडून पाहतो. मी माझा फोन पाहत असेन तर तो लगेच माझा फोन घेतो आणि मग तो चेक करतो की मी फोनवर काय करत आहे. त्याच्यामुळे मी एक चांगली आई नक्कीच होऊ शकते. कारण माझ्याकडे रणबीर कपूर आहे.' दिग्दर्शक अनुराग कश्यपचा चित्रपट 'बॉम्बे वेलवेट'मध्ये एकत्र काम केल्यानंतर आणि रणबीर कपूर यांनी करण जोहरसोबत 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटात काम केलं होतं. ज्यात ऐश्वर्या रायची सुद्धा महत्त्वाची भूमिका होती. अनुष्काच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती अखेरची २०१८ मध्ये 'झीरो' चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसली होती. त्यानंतर ती बराच काळ बॉलिवूडपासून दूर आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/39ZREU7