Full Width(True/False)

आर्थिक अडचणींमुळे अभिनय करणारी सामंथा अक्किनेनी कशी झाली कोट्यवधींची मालकीण

मुंबई- लोकप्रिय अभिनेत्री आज तामिळ चित्रपटसृष्टीचा एक नावाजलेला चेहरा आहे. फक्त दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचं नाही तर बॉलिवूडच्या चाहत्यांमध्येही तिच्या नावाची चर्चा असते. आपल्या आरसपानी सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी सामंथा आज तिचा ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. दरवर्षी तिचे पाच ते सहा चित्रपट प्रदर्शित होतात. प्रेक्षकही तिच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या अभिनयाने सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी सामंथा फक्त पैशांच्या कमतरतेमुळे अभिनय क्षेत्रात आली होती. सामंथाचा जन्म २८ एप्रिल १९८७ रोजी चेन्नईमध्ये झाला होता. तिने २०१० साली 'या माया चेस्वे' या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. त्यानंतर अवघ्या काही वर्षातच तिची लोकप्रियता एवढी वाढली की आता ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा एक चेहरा झाली आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी सामंथा छोटे- मोठे पार्टटाइम जॉब करत होती. परंतु, त्या पैशांवर त्यांचा उदरनिर्वाह होत नव्हता. सामंथाने तामिळ, मल्याळम आणि तेलगू भाषेतील अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विजय सेतुपतीसोबतच्या 'मार्शेल' आणि रामचरण सोबतच्या 'रंगस्थलम' चित्रपटांनी तिला ओळख मिळवून दिली. २०१३ साली तामिळ आणि तेलगू भाषेतील सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीच्या पुरस्कारावर तिने स्वतःचं नाव कोरलं. सामंथाच्या अभिनयासोबतच ती तिच्या हटके स्टाइलसाठीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. तिचा फॅशन सेन्स खूप चांगला आहे. तिच्या कपड्यांमुळे ती अनेकदा चर्चेत असते. ती नेहमीच साध्या वेशात असते तरीही ती चाहत्यांना तिच्याकडे आकर्षित होतात. सामंथाने सुपरस्टार नागार्जुन यांचा मुलगा नागा चैतन्य याच्याशी लग्नगाठ बांधली आहे. त्यांचा प्रेम विवाह झाला होता. सामंथा आणि नागा चैतन्य यांच्या लग्नात त्यांनी तब्बल १० कोटी रुपये खर्च केले होते. त्यांचं लग्न एक रॉयल वेडिंग मानली जाते. त्यांच्या लग्नाला बॉलिवूड, टॉलिवूड आणि राजकारणामधील अनेक महत्वाच्या व्यक्तींची उपस्थिती होती. सामंथा आणि नागा चैतन्य सध्या त्यांच्या हैदराबाद येथील आलिशान घरात राहतात. त्यांच्या घरात भरपूर सुखसोयी असून भल्यामोठ्या गार्डन पासून स्वतःच्या थिएटर पर्यंत सगळ्या गोष्टी आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aL8O8b