नवी दिल्लीः भारतात करोनाची दुसरी लाट आल्यासारखे चित्र आहे. रोज करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मृत्युमुखींची संख्या सुद्धा वाढत आहे. करोना विरुद्धच्या लढाईत भारताला मदत करण्यासाठी फेसबुक, अॅपल, अॅमेझॉन, ओप्पो आणि विवोसह अनेक कंपन्यांनी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. अॅमेझॉन इंडियाने मंगळवारी म्हटले की, १०० व्हेंटिलेटर्स दिले आहेत. याला देशात तात्काळ आयात केले जाणार आहे. याला विमानाद्वारे देशात आयात केले जणार आहे. वाचाः फेसबुककडून १ कोटी डॉलर देण्याची घोषणा फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्गने म्हटले की, कंपनी युनिसेफ सोबत मिळून काम करीत आहे. कंपनी एक कोटी डॉलर उपलब्ध करणार आहे. भारतातील करोना नियंत्रणात येईपर्यंत भारतासोबत मदतीसाठी कंपनी तयार राहणार आहे. फेसबुक यात युनिसेफ सोबत मिळून काम करीत आहे. वाचाः गुगलकडून १३५ कोटी रुपयांची घोषणा अॅपलचे सीईओ टिम कुक आणि गुगल भारतीय मूळचे सीईओ सुंदर पिचाई यांनी करोना व्हायरसला रोखण्यासाठी भारताला १३५ कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. कंपनीने आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून भारत, युनिसेफ आणि अन्य संघटनेच्या प्रयत्नाच्या मदतीसाठी १३५ कोटी रुपये मदत देणार आहे. वाचाः Vivo कडून २ कोटी रुपयांची घोषणा विवो इंडियाने मंगळवारी कोविड १९ साठी मदत म्हणून दोन कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. आक्सिजन कन्सन्ट्रेटर घेण्यास याची मदत होणार आहे. या लढाईविरुद्ध आपल्या सर्वांना मिळून लढावे लागणार आहे, असे विवो इंडियाचे निपून मारया यांनी म्हटले आहे. वाचाः ओप्पोने ऑक्सिजननेटर्स आणि बँड देण्याची घोषणा ओप्पोने रेड क्रॉस सोसायटी आणि उत्तर प्रदेश सरकारला १ हजार ऑक्सिजनेटर्स आणि ५०० श्वास घेणाऱ्या मशीनची अनुदान घेण्याची तयारी केली आहे. यासोबतच ५ हजार युनिट ओप्पो बँड स्टायल देण्याचे म्हटले आहे. कंपनी या मशिन्स त्या हॉस्पिटलला उपलब्ध करणार आहे. ज्याची जास्त आवश्यकता आहे. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3t0sk6K