Full Width(True/False)

करोनामुळे 'तारक मेहता...' मधील नट्टू काका झाले बेरोजगार

मुंबई- करोनामुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांची कपात केली गेली आहे. तर जे कर्मचारी काम करत आहेत त्यांचादेखील कमी पगार दिला जात आहे. करोनाचा फटका एण्टरटेनमेन्ट इण्डस्ट्रीलादेखील बसला आहे. महाराष्ट्रात सुरू झालेल्या लॉकडाउनमुळे अनेक मालिकांचं चित्रीकरण बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक छोटे कलाकार बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. टीव्हीवरील लोकप्रिय मालिका '' मधील देखील सध्या बेरोजगारीचे शिकार झाले आहेत. २०२० साली सुरू झालेल्या लॉकडाउनमध्ये अनेकांनी बेरोजगारीमुळे आत्महत्या केली होती. तिच परिस्थिती आता पुन्हा दिसू लागली आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत नट्टू काकांची भूमिका साकारणारे अभिनेते यांनी त्यांची आर्थिक स्थितीबद्दल सांगितली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील एका महिन्यापासून ते घरीच आहेत. त्यांना हेदेखील माहीत नाही की, पुन्हा चित्रीकरणासाठी कधी बोलावलं जाईल किंवा मालिकेत त्यांचं पात्र पुन्हा कधी दाखवलं जाईल. आता करोनामुळे मालिकेचं चित्रीकरण पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. घनश्याम यांनी सांगितल्यानुसार, 'मी शेवटचं चित्रीकरण मार्च महिन्यात केलं होतं. त्यानंतर मी घरीच आहे. निर्मात्यांनी चित्रीकरणाची जागा बदलण्याचादेखील कोणताही विचार केलेला नाही.' याशिवाय काही दिवसांपूर्वी मालिकेचे निर्माते असित मोदी आणि गोलीची भूमिका साकारणारा अभिनेता कुश शाह यांच्यासह अनेक कलाकार करोनाबाधित झाले होते. घनश्याम यांचं वय जास्त असल्याने त्यांचे घरचेदेखील चिंतेत असतात. परंतु, त्यांना सेटवर पुन्हा जाण्याची इच्छा आहे. मालिकेचा सेट मुंबईत असल्याने सध्या मालिकेचं चित्रीकरण बंद ठेवण्यात आलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sLRUfO