Full Width(True/False)

'तिसऱ्या मुलाला जन्म दिल्यास तुरुंगवास' कंगनाचं ट्वीट चर्चेत

मुंबई: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री कंगना रणौतनं पुन्हा एकदा अशी काही ट्वीट्स केली आहे. ज्यामुळे सोशल मीडिया पुन्हा एकदा नवा वाद होताना दिसत आहे. नुकत्याच केलेल्या आपल्या ट्वीटमध्ये कंगनानं भारतातील वाढत्या लोकसंख्येवर भाष्य करत हे रोखण्यासाठी कठोर कायदे तयार करण्याची गरज असल्याचं म्हणत भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख करत काही वादग्रस्त मुद्दे मांडले आहेत. कंगना रणौतनं आपल्या एका ट्वीटमध्ये लिहिलं, 'भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जेव्हा लोकांना जबरदस्तीनं नसबंदी करायला लावली होती त्यावेळी त्या निवडणूक हारल्या होत्या आणि त्यानंतर त्यांची हत्यासुद्धा करण्यात आली होती. पण आता आजच्या काळात भारतातील हे एक संकट आहे. त्यामुळे यासाठी काही कठोर कायदे तयार करण्याची गरज आहे. ज्या अंतर्गत एखाद्या दापत्यानं जर तिसऱ्या मुलाला जन्म दिला तर त्याला दंड किंवा काही वर्षांचा तुरुंगवास अशाप्रकारची शिक्षा दिली गेली पाहिजे.' दुसऱ्या एका ट्वीटमध्ये कंगनानं लिहिलं, 'देशातील वाढत्या लोकसंख्येमुळे लोक मरत आहेत. कागदावर फक्त १३० कोटी भारतीय असते तरी याशिवाय जवळपास २५ कोटीपेक्षा जास्त भारतीय हे अवैध प्रवासी मजूर आहेत जे बाहेरच्या देशातून येऊन भारतात वास्तव्य करत आहेत.' कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर तिचा आगामी चित्रपट 'थलायवी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कंगनानं तमिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री आणि अभिनेत्री जे जयललिता यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय यानी केलं असून या चित्रपटात अरविंद स्वामी, नासर आणि भाग्यश्री यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. करोना व्हायरसमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली असून नव्या रिलीज डेटची घोषणा अद्याप झालेली नाही. याशिवाय कंगना 'धाकड' आणि 'तेजस' या चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gxGj1D