Full Width(True/False)

पडद्यावरील खलनायकांच्या मुली काय करतात? एकआहे सुपरहिट अभिनेत्री

मुंबई : बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये नेहमीच नायक जिंकताना दाखवले जाते. जरी असे असले तरी खलनायकांशिवाय नायकांच्या विजयला काहीच अर्थ नसतो. हिंदी सिनेमांमध्ये ज्य पद्धतीने खलनायक रंगवले जातात ते पाहून प्रत्यक्षातही लोक त्यांना घाबरतात. मोठ्या पडद्यावर खलनायक साकारणारे सर्व दिग्गज कलाकार होते. अर्थात या कलाकारांनी काही सिनेमांमध्ये सकारात्मक भूमिका केल्या असल्या तरी ते खलनायक म्हणूनच प्रेक्षकांच्या स्मरणात राहतात. आज आपण या खलनायकांबद्दल नाही तर त्यांच्या वास्तविक आयुष्यातील मुलींबद्दल जाणून घेणार आहोत. आणि श्रद्धा कपूर शक्ती कपूर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय खलनायक म्हणून ओळखले जातात. अर्थात त्यांनी सहाय्यक भूमिका आणि कॉमेडी भूमिकादेखील खूप केल्या आहेत. त्यांची मुलगी श्रद्धा कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कुलभूषण खरबंदा- श्रुती खरबंदा कुलभूषण खरबंदा यांनी सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. अमिताभ बच्चन आणि शशी कपूर यांच्या सिनेमात त्यांनी शाकाल नावाची खलनायकी भूमिका साकारली होती. अशा या कलाकाराची मुलगी श्रुती खरबंदा या सिनेसृष्टीपासून लांब आहे. मात्र ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. -नम्रता पुरी बॉलिवूडमधील खलनायकांची चर्चा सुरू आहे तर त्यामध्ये अमरीश पुरी यांचे नाव अग्रक्रमानेच घेतले पाहिजे. अमरीश पुरी आज आपल्यात नाही परंतु त्यांनी सिनेमांतून साकारलेल्या अभिनयांतून ते आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. बॉलिवूडमध्ये स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशा या ज्येष्ठ कलाकाराची मुलगी नम्रता पुरी ही अभिनयाच्या सृष्टीत नसली तरी मनोरंजन सृष्टीशी संबंधित असून ती फॅशन डिझायनर आहे. अमजद खान- अहलम खान अमजद खान यांचे नाव घेताच क्षणी आपल्या डोळ्यांसमोर येतो तो शोले सिनेमातील खलनायक गब्बर! अमजद खान यांची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. त्यांची मुलगी अहलम खानने देखील सिनेमांमध्ये काम केले आहे, परंतु तिला थिएटरमध्ये काम करायला जास्त आवडते. रंजीत- दिव्यांका बेदी रंजीत यांनीही बहुतांशवेळा सिनेमांमध्ये खलनायक भूमिका साकारल्या आहेत. खलनायकाला साजेसे असणारे बेरकी डोळे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. रंजीत यांनी साकारलेले खलनायक आजही प्रेक्षकांना आठवतात. त्यांची मुलगी दिव्यांका ही प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहे. ओम शिवपुरी- रितु शिवपुरी ओम पुरी यांनी ७० चे ८० च्या दशकामध्ये अनेक सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांची मुलगी रितु शिवपुरी ही देखील सिनेमात काम करते. परंतु अनेक वर्षांपासून ती कोणत्याही सिनेमांत दिसलेली नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3go6qb3