Full Width(True/False)

कार्तिकच नाही तर या कलाकारांनाही सिनेमांतून काढण्यात आलं

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. धर्मा प्रोडक्शननं कार्तिकला त्यांच्या 'दोस्ताना २' या बिग बजेट चित्रपटातून बाहेर केलं आहे. ज्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. कार्तिकचं वागणं खूपच अनप्रोफेशनल असल्याचं कारण देत या पुढे कधीच आपण कार्तिकसोबत काम करणार नसल्याचं धर्मा प्रोडक्शननं स्पष्ट केलं आहे. पण अशाप्रकारे चित्रपटातून बाहेर केला गेलेला कार्तिक हा पहिलाच अभिनेता नाही. या आधीही अनेक प्रसिद्ध कलाकारांना बिग बजेच चित्रपटातून अशाचप्रकारे बाहेर काढण्यात आलं होतं. कहो ना प्यार है या चित्रपटातून अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांचा मुलगा हृतिक रोशननं बॉलिवूड पदार्पण केलं होतं. या चित्रपटासाठी अगोदर अभिनेत्री करिना कपूरला कास्ट करण्यात आलं होतं. चित्रपटाच्या काही भागाचं करिनानं शूटिंग सुद्धा पूर्ण केलं. पण त्यानंतर ती स्वतःच या चित्रपटातून बाहेर पडली. त्यानंतर तिच्या जागी अभिनेत्री अमिषा पटेलला घेण्यात आलं आणि रिलीजनंतर हा चित्रपट सुपरहिट ठरला. चलते चलते शाहरुख खानच्या या चित्रपटात सुरुवातीला अभिनेत्री ऐश्वर्या रायला कास्ट केलं गेलं होतं. पण त्याच वेळी तिचा सलमान खानसोबत काही वाद सुरू होता ज्यामुळे तिला हा चित्रपट सोडावा लागला. ज्यानंतर ऐश्वर्याच्या जागी राणी मुखर्जीला या चित्रपटासाठी कास्ट केलं गेलं. राबता दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही पण या चित्रपटाची गाणी मात्र खूप गाजली. या चित्रपटासाठी आधी आलिया भट्टला कास्ट केलं गेलं होतं. पण तिच्या इतर चित्रपटाच्या शेड्युलमुळे तिला हा चित्रपट सोडावा लागला होता. हाफ गर्लफ्रेंड अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटासाठी सुरुवातीला दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतला कास्ट करण्यात आलं होतं पण नंतर या चित्रपटात अर्जुन कपूरला घेण्यात आलं. याचा खुलासा स्वतः सुशांत आणि चित्रपटाचे लेखक चेनत भगत यांनी केला होता. कबीर सिंग शाहिद कपूरची मुख्य भूमिका असलेला 'कबीर सिंग' हा चित्रपट २०१९ मधला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणी हिनं मुख्य भूमिका साकारली होती. पण कियाराच्या आधी या चित्रपटासाठी अभिनेत्री तारा सुतारियाची निवड करण्यात आली होती. पण तारा दुसऱ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये बीझी असल्यानं तिला हा चित्रपट सोडावा लागला. जोधा अकबर संजय लीला भन्साळी यांचा बिग बजेट चित्रपट 'जोधा अकबर'मध्ये हृतिक रोशन आणि यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट खूपच हिट झाला. पण या चित्रपटासाठी मेकर्सनी सर्वात आधी अभिनेता रणबीर कपूरला विचारलं होतं पण नंतर त्याला या चित्रपटातून बाहेर करण्यात आलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sD4qhr