Full Width(True/False)

अम्मा मला न्यायला आलीय..इरफान यांचे शेवटे शब्द ऐकूण सुतापा यांचा बांध फुटला

मुंबई- हासिल, मकबूल, पान सिंह तोमर या सिनेमांनी इतिहास रचला. या सिनेमातून आपल्या अभिनयाचं कौशल्य दाखवलेल्या यांचं २९ एप्रिल २०२० रोजी निधन झालं होतं. कोलन इन्फेक्शनमुळे त्यांना कोकिलाबेन इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. पण त्यांची प्राणज्योत मालवली. ते ५३ वर्षांचे होते. यावेळी त्यांच्यासोबत संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. आईवर अतोनात प्रेम असणाऱ्या इरफान यांना त्यांच्या शेवटच्या क्षणीही आईचीच आठवण येत होती. आईच्या आठवणीतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडलेले इरफान यांचं जाणं हे सर्वांना दु:ख देऊन गेलं. बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं असलयाची साऱ्यांची भावना आहे. त्यांच्या पश्चात दोन मुलं आणि पत्नी असा परिवार आहे. इरफान यांच्या निधनापूर्वी तीन आधी त्यांच्या आईचं निधन झालं होतं. त्या ९५ वर्षांच्या होत्या. आईला शेवटच्या क्षणी पाहता न आल्याचं दुःख त्यांच्या मनात एवढं होतं की, जगाचा निरोप घेताना त्यांच्या तोंडी फक्त आईचं नाव होतं. एका रिपोर्टनुसार, मृत्यूशी लढत असताना इरफान यांनी पत्नी सुतापा सिकदर यांना 'अम्मा खोलीत आहे' असं सांगितलं. मृत्यूवेळी होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी अम्मा आली असं इरफान यांना वाटत होतं. इरफान यांनी सुतापा यांना सांगितलं, 'बघ ती माझ्याच बाजूला बसली आहे. अम्मा मला न्यायला आली आहे.' इरफान यांचं हे बोलणं ऐकून सुतापा यांचा बांध फुटला आणि त्या रडू लागल्या. यानंतर काही क्षणात इरफान खान यांनी जगाचा निरोप घेतला. २०१८ पासून सुरू होते उपचार इरफान खान यांना न्यूरोएण्डोक्राइन ट्यूमरचा आजार होता. लंडनमध्ये त्यांच्यावर काही काळ उपचारही सुरू होते. तब्येतीत सुधारणा आल्यानंतर ते भारतात परतले होते. रली आहे. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, परेश रावलसह अन्य अनेक सेलिब्रिटींनी आणि राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावर इरफान यांना श्रद्धांजली वाहिली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2YiHicz