Full Width(True/False)

‘आम्ही गाणं गायलं आणि दुसऱ्या दिवशी तो आम्हाला सोडून गेला’

मुंबई : दिवंगत अभिनेता यांना जाऊन आज एक वर्ष झाले. परंतु ते आपल्यातून गेले हे त्यांच्या चाहत्यांना आजही पटत नाही, त्यांचा यावर विश्वासही नाही. इरफान खान यांचे मित्र, परिवार, चाहते आजही त्यांच्या निधनाच्या दुःखातून बाहेर आलेले नाही. इरफान खान यांच्या पत्नी यांनी आपल्या पतीच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त सोशल मीडियावर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. यात सुतापा यांनी मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या आहेत. एनएसडीमधील दिवसांना सुतापा यांनी उजाळा देत भाविनक पोस्ट लिहिली आहे. यात त्यांनी लिहिले आहे की, 'एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या लोकांना मृत्यूचे भय नसते...' अनास हे इरफान यांचे आवडते कवी होते. काय लिहिले आहे सुतापा यांनी सुतापा यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या नोटमध्ये लिहिले, ' गेल्या वर्षी याच दिवशी मी आणि इरफानने मिळून आमच्या मित्रांसाठी त्यांच्या आवडीची गाणी गायली होती. त्यावेळी हॉस्पिटलमधल्या नर्स आमच्याकडे आश्चर्याने बघत होत्या. कारण अशावेळी बहुतेकवेळा देवाचा धावा करणारे मंत्र म्हटलं जातात. त्यांना आमचे वागणे अतिशय विचित्र वाटत होते.' सुतापा यांनी पुढे लिहिले की, 'दोन वर्ष इरफानसाठी सकाळ आणि संध्याकाळ एकसारखीच होती. त्यामुळे मला असे वाटत होते की त्याने जाताना काही छान स्मृती सोबत घेऊन जाव्यात आणि खरोखरच तो दुसऱ्या दिवशी निघून गेला. त्याला माहीत होतं की तो जाणार आहे. ३६३ दिवस ८ हजार ७१२ तास हा एक असा काळ होता की आम्ही समुद्रात पोहत होतो आणि वेळ तिथेच थांबून राहिला होता.' सुतापा यांनी सांगितले आहे की इरफान यांना अंकांमध्ये खूपच रुची होती. त्याबाबत सुतापा यांनी लिहिले की, ' माझ्यासाठी २९ एप्रिल ११.११ वाजता सगळे काही संपले होते. काहीजण म्हणतात की ११-११-११ हा एक रहस्यमयी आकडा आहे. ज्या दिवशी इरफान गेले तेव्हाही हेच तीन आकडे होते. '


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3e2sCG9