Full Width(True/False)

'वर्क फ्रॉम होम' कंपनीसाठी ठरले फायद्याचे, वर्षभरात वाचवले ७४०० कोटी रुपये

नवी दिल्लीः गेल्या वर्षी जगभरात करोना व्हायरस आल्याने अनेक कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले. वर्ष लोटले असले तरी अजूनही अनेक कंपन्यांचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करीत आहेत. आता अनेकांसाठी वर्क फ्रॉम होम नॉर्मल झाले आहे. वर्क फ्रॉम होम मुळे कर्मचाऱ्यांना काही गोष्टींचा त्रास होत असला तरी कंपन्यांना मात्र फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. जगातील सर्वात मोठी टेक्नोलॉजी कंपनी Google, Apple, Microsoft, Facebook, Twitter ने सर्वात आधी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करून दिली होती. आता एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे. गुगलने वर्क फ्रॉम होम मुळे १ बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ७४०० कोटी रुपये वाचवले आहेत. वाचाः यातून वाचले कंपनीचे पैसे महामारी मुळे गुगलचे कर्मचारी वर्षभरापासून वर्क फ्रॉम होम करीत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत कंपनीने प्रमोशन आणि इंटरनटेमेंटचा खर्च कमी केला. त्यातून कंपनीला २६८ मिलियन डॉलर म्हणजेच १९८० कोटी रुपये वाचवता आले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, फक्त कोविड १९ मुळे हे शक्य झाले आहे. दरवर्षी जर खर्चाचा एकूण विचार केला तर १ बिलियन डॉलर म्हणजेच ७ हजार ४०० कोटी रुपये अधिक कंपनी खर्च करीत असते. त्यामुळे वर्षभरात कंपनीला काहीच करावे लागले नसल्याने हा संपूर्ण पैसा कंपनीचा वाचला आहे. वाचाः करोनामुळे गुगलचा बिझनेस वाढला महामारीमुळे अनेक सेक्टरला फटका बसला आहे, हे आपण अनेकदा वाचले, ऐकले आहे. परंतु, या दरम्यान इंटरनेटचा सर्वात जास्त वापर करण्यात आला आहे. याचा परिणाम म्हणजे गुगलला अच्छे दिन पाहायला मिळाले. गुगलचा रेवेन्यू जवळपास ३४ टक्के वाचला आहे. वाचाः या ऑफिसला उघडण्याची प्लानिंग गुगल करीत आहे कंपनी या वर्षीच्या अखेरला ऑफिसमध्ये काम सुरू करण्याची प्लानिंग करीत आहे. चीफ फायनान्शियल ऑफिसर रुथ पोराटने गुंतवणूकदारांना सांगितले की, कंपनी हायब्रिड मॉडलवर लोकांना ऑफिसला बोलावण्याची योजना बनवीत आहे. ज्यात ऑफिस येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आधीच्या तुलनेत कमी असणार आहे. वाचा : वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nxUPYu