Full Width(True/False)

जेव्हा ऋषींनी अपयशासाठी गरोदर नीतू यांना मानलं होतं जबाबदार

मुंबई: बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता यांचा आज प्रथम स्मृतीदिन आहे. जवळपास २ वर्ष कॅन्सरशी लढा दिल्यानंतर ३० एप्रिल २०२० रोजी ऋषी कपूर यांनी जगाचा निरोप घेतला. ऋषी कपूर आज आपल्यात नसले तरीही त्यांच्या असंख्य आठवणी, सिनेसृष्टीतील योगदान आणि त्यांचे मजेदार किस्से आजही प्रेक्षक आणि चाहत्यांच्या मनात जिवंत आहेत. ऋषी कपूर यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त जाणून घेऊयात त्याच्याबद्दलचे असेच काही किस्से... अनेक लोकांना वाटतं की, ऋषी कपूर यांचा पहिला चित्रपट 'मेरा नाम जोकर' हा होता पण असं नाही आहे. ऋषी कपूर यांनी 'श्री ४२०' या चित्रपटातून बालकलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात लोकप्रिय गाणं 'प्यार हुआ इकरार हुआ' चित्रित करण्यात आलं होतं. ज्यात राज कपूर आणि निर्गिस यांच्यातील रोमान्स दाखवण्यात आला होता. याच गाण्यात तीन मुलं एकामेकांचा हात धरून चालताना दिसत आहेत. ज्यातील सर्वात लहान मुलगा ऋषी कपूर होते. ४ सप्टेंबर १९५२ रोजी जन्मलेल्या ऋषी कपूर यांनी आपल्या ५० वर्षांच्या सिनेकरिअरमध्ये एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले. राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार हे तर त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच मिळाले होते. दुसरीकडे यांनी १९७३ मध्ये 'रिक्शावाला' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. ज्यात त्या रणधीर कपूर यांच्यासोबत दिसल्या होत्या. त्यानंतर पुढच्या १० वर्षांमध्ये त्यांनी तब्बल ५० चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. ज्यातील १२ चित्रपटांमध्ये त्या ऋषी कपूर यांच्यासोबत दिसल्या. ज्यात 'खेल खेल में', 'रफू चक्कर', 'कभी कभी', 'अमर अखबर एंथनी', 'दुनिया मेरी जेब में' आणि 'पति पत्नी और वो' या चित्रपटांचा समावेश होता. अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम करता करता ऋषी कपूर आणि नीतू एकमेकांच्या प्रेमात पडले. २२ जानेवारी १९८० रोजी या दोघांनी लग्न केलं आणि सप्टेंबर १९८० मध्ये त्यांची मुलगी रिद्धीमाचा जन्म झाला. पण नीतू कपूर यांच्यासाठी त्यांच्या प्रेग्नन्सीचा काळ खूपच कठीण गेला. ज्याचा खुलासा खुद्द ऋषी कपूर यांनी त्याची बायोग्राफी 'खुल्लम खुल्ला'मध्ये केला होता. ऋषी कपूर यांनी आपल्या बायोग्राफीमध्ये त्यांच्या आयुष्यात आलेल्या चढ-उतारांबद्दल आणि त्यामुळे त्यांच्या वैवाहिक नात्यावर झालेल्या परिणामांबद्दल सांगितलं आहे. त्यांचा पहिला चित्रपट 'बॉबी' सुपरहिट झाला होता. त्यामुळे त्यांच्या स्वतःकडून असलेल्या अपेक्षा फार वाढल्या होत्या. पण जेव्हा काही काळानंतर जेव्हा त्यांचे चित्रपट फ्लॉप व्हायला सुरुवात झाली त्यावेळी मात्र ते खूप वैतागले होते. त्याचवेळी नीतू कपूर गर्भवती होत्या आणि सातत्यानं फ्लॉप होणाऱ्या चित्रपटांमुळे ऋषी कपूर डिप्रेशन जायला सुरुवात झाली होती. ज्यानंतर त्यांनी आपल्या अपयशासाठी नीतू कपूर यांना जबाबदार धरायला सुरुवात केली. ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आणि तणाव येऊ लागला होता. ऋषी कपूर यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं, 'नीतू त्यावेळी गर्भवती होती आणि आमची मुलगी रिद्धिमाचा जन्म होणार होता. असं असताना तिनं माझं हे वागणं सहन केलं. नंतर मी माझे सहकलाकार, कुटुंबीय आणि मित्रांच्या मदतीनं डिप्रेशनमधून बाहेर आलो. पण मी हे समजू शकतो की, माझ्या या वागण्याचा तिच्यावर काय परिणाम झाला असेल तिला किती दुःख झालं होतं.' ऋषी कपूर आणि नीतू ही बॉलिवूडच्या सुपरहिट जोड्यांपैकी एक होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3u7ACeG