Full Width(True/False)

सैफ-करिनाच्या लग्नात आनंदी नव्हत्या शर्मिला; त्यांनीच केला खुलासा

मुंबई : आपल्या मुलाच्या लग्नामध्ये प्रत्येक वरमाय ही नेहमीच आनंदी आणि कमालीची उत्साही असते. परंतु प्रसिद्ध अभिनेत्री यांच्या मुलाच्या म्हणजे सैफ अली खानच्या लग्नाच्यावेळेस त्यांना आनंद, उत्साह वाटत नव्हता. यामागे नेमके काय कारण होते, याचा खुलास खुद्द शर्मिला यांनीच एका मुलाखतीमध्ये केला आहे. आणि यांचे २०१२ मध्ये झाले. या दोघांनी जेव्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो सर्वांसाठी मोठा आश्चर्याचा धक्का होता. यांचे लग्न कसे टिकणार याबाबत उलटसुलट चर्चाही झाली होती. परंतु आज हे दोघेजण आपल्या दोन मुलांसह सुखाने संसार करत आहेत. जेव्हा या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा दोघांच्याही घरातील सर्व सदस्य आनंदात आणि उत्साहात होते. अपवाद फक्त शर्मिला टागोर यांचा होता... या मागचे कारण होते त्यांचे पती आणि सैफचे वडील मन्सूर अली खान पटौदी! सैफ आणि करीनाचे लग्न होण्याची बरोबर एक वर्ष आधी मन्सूर अली यांचे निधन झाले. एका मुलाखतीमध्ये शर्मिला यांनी सांगितले, ' सैफच्या लग्नाबद्दल मी अजिबात उत्सुक, आनंदी नव्हते हे खरे आहे. लग्नात तुम्ही काय परिधान करणार असे विचारले तेव्हा मी सांगितले की हा सगळ्यांसाठी आनंदाचा क्षण आहे मी काय परिधान केले आहे याने त्या आनंदावर कोणताही फरक पडणार नाहीये. त्यामुळे मी माझ्या कलेक्शनमधीलच एक साडी लग्नावेळी नेसले होते,' असे त्यांनी सांगितले. तुम्ही या दोघांच्या लग्नासाठी उत्सुक नव्हत्या का असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी सांगितले, 'सैफ आणि करीनाच्या लग्नावेळी मी फार उत्सुक नव्हते कारण माझ्या पतीचे निधन होऊन वर्षही पूर्ण झालेले नव्हते. परंतु कुटुंबातील इतर सदस्य या लग्नासाठी खूपच उत्सुक होते.' दरम्यान, सप्टेंबर २०११ मध्ये मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन झाले. त्यावेळी करीना कपूर देखील तेथे उपस्थित होती. ऑक्टोबर २०१२ मध्ये सैफ अली खान आणि करीन कपूरचे लग्न झाले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eBQVKa