मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि दिग्दर्शक-निर्माता यांच्यात मागच्या बऱ्याच काळापासून वाद सुरू आहेत. सर्वात आधी करणवर कंगनानं बॉलिवूडच्या घराणेशाहीला पाठिंबा दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर ती अनेकदा करणवर टीका करताना दिसली. मागच्या वर्षी सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर तर तिनं करणवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. आताही तिनं पुन्हा एकदा करणवर निशाणा साधला आहे. कंगनानं ट्विटरवर एक एडिटेड व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात करणाच्या डान्स परफॉर्मन्ससोबत कंगनाच्या आगामी चित्रपटाचं 'चली-चली' गाण्याचा ऑडिओ एडिट करून लावण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये करण जोहर एका कार्यक्रमात डान्स करताना दिसत आहे. कंगनानं हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, 'आतापर्यंतचा सर्वात बेस्ट' या आधीही काही दिवसांपूर्वीही कंगनानं अशाचप्रकारे नाव न घेता करण जोहरवर टीका केली होती. त्याचा शो 'कॉफी विथ करण'च्या मुद्द्यावरून कंगनानं करणवर निशाणा साधला होता आणि यावेळी तिनं सिमी ग्रेवालच्या टॉक शोचं कौतुकही केलं होतं. कंगनाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर येत्या २३ एप्रिलला तिचा चित्रपट '' रिलीज होणार आहे. ज्यात ती तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या व्यतिरिक्त कंगनाकडे 'धाकड' आणि 'तेजस' हे चित्रपट सुद्धा आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wsPDt9