Full Width(True/False)

तिच्यामुळे मला कोणतंही काम मिळालं नाही... प्रियांका चोप्राची बहीण मीराचा धक्कादायक खुलासा

मुंबई- लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री सध्या हॉलीवूडमध्येही तिच्या अभिनयाची छाप पाडत आहे. परंतु, तिच्या काकांची मुलगी असलेली मात्र बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी इतरांप्रमाणे स्ट्रगल करत आहे. २०१४ साली आलेल्या 'गँग्स ऑफ घोस्ट्स' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मीरा स्वतःच्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये नाव कमवायला सज्ज झाली आहे. नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मीराने तिच्या बॉलिवूडमधील करिअरबद्दल अनेक खुलासे केले. त्यात तिने तिला प्रियांकामुळे कोणतंही काम मिळालं नसल्याचं सांगितलं. मीराने तिच्या अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरुवात तामिळ आणि तेलगू चित्रपटात काम करून केली. '१९२० लंडन' चित्रपटात झळकलेल्या मीराने प्रियांकाबद्दल सांगताना म्हटलं, 'जशी मी बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली तशी सगळीकडेच चर्चा होऊ लागली की, प्रियांका चोप्राची बहीण आली आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर तिच्यामुळे मला कधीही कोणतीही भूमिका मिळाली नाही. तिने कधीही मला एखादी भूमिका मिळवून देण्यासाठी मदतदेखील केली नाही. त्याउलट जेव्हा मला एखाद्या निर्मात्यांची गरज होती तेव्हा लोकांनी मला काम दिलं नाही कारण मी प्रियांका चोप्राची बहीण आहे. ' पुढे कामाबद्दल बोलताना ती म्हणाली, 'खरं सांगायचं तर, प्रियांकासोबत असलेल्या नात्यामुळे मला कधीही मदत मिळाली नाही फक्त लोकांनी मला गंभीरपणे घेतलं इतकंच. मी अगोदर तामिळ चित्रपटात काम केलं होतं आणि मी फिल्मी कुटुंबातून आहे हे माहित असल्याने बॉलिवूडमध्ये मला कधीही वेगळी वागणूक मिळाली नाही. मला कमीपणाची वागणूक मिळाली नाही. इतकाच प्रियांकाची बहीण असल्याचा मला फायदा झाला. बाकी मला माझ्या करिअरसाठी खूप स्ट्रगल करावा लागला. मी नशीबवान आहे की माझी तुलना कधी प्रियांका आणि परिणीतीसोबत झाली नाही.' मीरा शेवटची 'सेक्शन ३७५' मध्ये पोलिसांच्या भूमिकेत दिसली होती. मीरा आता ओटीटीवर पदार्पण करणार आहे. यासोबतच तिचा अर्जुन रामपालसोबतच 'नास्तिक' चित्रपटदेखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2S5nTuF