मुंबई : अभिनेता प्रतिक बब्बरने आपल्या आईला, स्मिता पाटीलला अनोख्या प्रकारे आदरांजली वाहिली आहे. प्रतिकने त्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्याचा हा फोटो पाहून युझरने लाईक करत त्यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. ख्यातनाम अभिनेत्री आणि अभिनेते राज बब्बर यांचा मुलगा प्रतिक. प्रतिकनेही काही हिंदी सिनेमांमध्ये काम केले आहे. प्रतिक सोशल मीडियावरही चांगलाच सक्रीय आहे. अलिकडेच त्याने आपल्या दिवंगत आईला अनोख्या प्रकारे आदरांजली वाहत त्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रतिकने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये प्रतिकने छातीवर त्याच्या आईचे, स्मिता पाटीलचे नाव आणि तिची जन्मतारीखेचा काढला आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने लिहिले ' माझ्या हृदयावर आईचे नाव कोरले आहे...' स्मिता पाटील यांनी हिंदी, गुजराती, मराठी, मल्याळम आणि कन्नड या भाषांमधील सिनेमांत काम केले आहे. इतकेच नाही तर त्यांनी एकूण ८० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले. स्मिता पाटील या अतिशय ख्यातनाम अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. अशा या गुणी अभिनेत्रीचे १३ डिसेंबर १९८६ रोजी निधन झाले. प्रतिकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, काही दिवसांपूर्वी ‘मुंबई सागा’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अभिनेता जॉन अब्राहम, इम्रान हाश्मी, काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत होते. तसेच प्रतिक ‘ब्रह्मास्त्र’ आणि ‘बच्चन पांडे’ या सिनेमांतही दिसणार आहे. प्रतिकने काही वेब सीरिजमध्ये देखील काम केले आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vv1cyH