Full Width(True/False)

अर्जुनने शेअर केला मंगळसूत्रासोबतचा फोटो, नेमकं काय सुरू आहे?

मुंबई- अभिनेता सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करत असतो. आज देखील त्याने एक असा फोटो शेअर केला आहे ज्यात त्याच्या हातात मंगळसूत्र दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत त्याने एक प्रश्नही विचारला आहे. विशेष म्हणजे हा प्रश्न त्याने मलायका अरोराला नाही तर अभिनेत्री करिना कपूर- खानला विचारला आहे. वाचून आश्चर्य वाटलं ना... पण हे खरंय.. त्याने प्रश्न करिनालाच विचारला आहे. '' ला पाच वर्ष पूर्ण अर्जुन कपूर आणि यांच्या 'की अँड का' या सिनेमाला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने अर्जुनने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्याने सिनेमाच्या आठवणींना उजाळा दिला आहे तसेच करिना कपूरला एक प्रश्नही विचारला आहे. फोटो शेअर करताना अर्जुनने लिहिले की, 'की अँड का' या सिनेमाच्या आठवणींचा हा एक भाग आहे. मी त्या सिनेमाच्या सेटला आणि ऑनस्क्रीनवरील 'की'ला खूप मिस करतो. हा सिनेमा माझ्यासाठी खूप खास होता कारण तो माझ्या आईसाठी केला होता. अभिनेत्री करिना कपूर आणि आर बाल्की सर यांच्यासोबत काम केल्यानंतर या सिनेमात काम करणं माझ्यासाठी अधिक जास्त खास झालं होतं. मला असं वाटतं की आपण याचा सिक्वेल करायला हवा... करिना तुला काय वाटतं याबद्दल? अर्जुनने ही पोस्ट केल्यानंतर काही मिनिटांमध्येच ती सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली आहे. अतिशय वेगळ्या धाटणीचा या सिनेमाला जाणकार प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर १०३ कोटी रुपयांची कमाई केली होती. अर्जुन कपूरचे आगामी सिनेमे दरम्यान, अर्जुन कपूर लवकरच 'भूत पुलिस' या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमामध्ये सैफ अली खानची प्रमुख भूमिका आहे. त्याशिवाय अर्जुन 'एक विलेन रिटर्न' या सिनेमातही दिसणार आहे. या सिनेमाचे चित्रिकरण सुरू झाले असल्याची माहिती अर्जुनने सोशल मीडियावर दिली होती. अर्जुन कपूर आणि परिणीता चोप्रा लवकरच 'संदीप औऱ पिंकी फरार' या सिनेमात एकत्र काम करणार आहेत. या सिनेमाचा दुसरा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fyfh9U