Full Width(True/False)

जय भवानी! ‘छावा’ मधून उलगडणार छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य

मुंबई- तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत अर्थातच छत्रपती संभाजीराजे! संभाजी राजे यांनी देखील आपल्या पराक्रमी वडिलांप्रमाणे इतिहास रचला आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजीराजांचेही नाव इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. आज इतक्या वर्षांनंतरही मराठ्यांच्या या राजावरचं प्रेम आणि त्यांच्याबद्दलचं आकर्षण लोकांच्या मनात कायम आहे. अगदी प्रत्येक पिढीतील लहान मुलांमध्येही आपल्या लाडक्या राजाबद्दल आत्मियता, प्रेम आणि आदर पाहायला मिळतं. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्य टिकवले. आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या साम्राज्याचा विस्तार केला. हिंदवी स्वराज्य निर्माण करणे हे सहज शक्य नव्हते, पण त्याहून कठीण होते ते निर्माण केलेले स्वराज्य टिकवणे, वाढवणे. छत्रपती संभाजी महाराजांनी हे आव्हान स्वीकारले आणि सक्षमपणे पेललेसुद्धा. या महान योद्ध्याचा पराक्रम आपल्याला लवकरच पहायला मिळणार आहे तोही थ्रीडी ॲनिमेटेड रूपात. ‘’ असे या थ्रीडी ॲनिमेशनपटाचे नाव असून भावेश प्रोडक्शनचे भावेश पाटील आणि शार्कफिन स्टुडिओचे ऋतुध्वज देशपांडे यांच्या प्रयत्नांतून हा थ्रीडी ॲनिमेशनपट साकारत आहे. ‘छावा’चे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या थ्रीडी ॲनिमेशनपटाचे दिग्दर्शन भावेश पाटील यांचे आहे. गीते समीर नेर्लेकर तर संगीत प्रेम कोतवाल यांचे आहे. ध्वनी आरेखन संकेत धोतकर यांचे आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या अजोड पराक्रमाची गाथा पुढच्या पिढीपर्यंत अॅनिमेशनच्या माध्यमातून अधिक प्रभावी व रंजकपणे पोहचविता येईल या विचाराने ‘छावा’ या थ्रीडी ॲनिमेशनपटाची निर्मिती केली असल्याचे दिग्दर्शक भावेश पाटील सांगतात.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PgqkK5