मुंबई- देशावर करोनाचं संकट असताना बॉलिवूडचे अनेक कलाकार मात्र गोवा आणि मालदीवला सुट्ट्या घालवण्यासाठी गेले होते. अनेकांनी त्यांच्या अशा वागण्याला चूक म्हणत त्यांची कानउघाडणी केली होती. प्रसिद्ध पत्रकार आणि लेखिका यांनीही बॉलिवूड कलाकारांच्या सोशल मीडियावर फोटो टाकण्यावर आक्षेप घेत त्यांना खडे बोल सुनावले होते. आता पुन्हा एकदा शोभा यांनी बॉलिवूड कलाकारांवर उपहासात्मक लेख लिहत त्यांच्या वागण्यावर ताशेरे ओढले आहेत. शोभा यांनी त्यांच्या लेखात लिहिलं की, देश करोनासारख्या महामारीच्या संकटाशी लढत असताना कशा प्रकारे या कलाकारांना त्यांचे बिकिनीमधले फोटो काढण्यासाठी जागा हवी आहे. सोनू सूदने या महामारीच्या काळात कित्येक गरजवंतांची मदत केली आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या लेखात सोनू सूदचं कौतुक देखील केलं आहे. त्यांनी लिहिलं, 'बिचारे हॉलिडेचे प्लॅन बनवणारे या बॉलिवूड कलाकारांच्या हॉलिडेवर तर जिवंत आहेत. त्यामुळे भारत जरी करोनाच्या यादीत सगळ्यात वरच्या स्थानावर असला तरीही लोकांनी या बिचाऱ्या कलाकारांना अशा प्रकारे असंवेदनशीलरित्या ट्रोल करणं चांगली गोष्ट नाही. त्यांच्यावर राग का काढायचा? त्यांचे पैसे, त्यांचा हॉलिडे, ते काय करू शकतात? प्रत्येकजण सोनू सूद नसतो.' यासोबतच शोभा यांनी आलिया भट्ट, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित, दिशा पाटनी यांच्या सुट्ट्यांबाबत तर लिहिलंच सोबत त्यांनी दिया मिर्झाच्या हनीमूनबद्दलही लिहिलं. त्यांनी लिहिलं, 'कशाला बहाणे शोधायचे? कशासाठी एवढी लाज वाटते? बास करा. कलाकार देशातील जनतेला घरी राहण्याची विनंती करतायत आणि दुसरीकडे स्वतः मात्र सगळीकडे फिरतायत. त्यात दिया मिर्झा सारखे काही नशीबवान कलाकारही असतात ज्यांना त्यांचं बेबी बम्प दाखवल्यावर शुभेच्छांचे मेसेज येतात.' काही दिवसांपूर्वी अनेक कलाकार मालदीववारी करून आलेले आहेत. त्यावर आपल्या लेखातून शोभा यांनी त्यांची शाळा घेतली आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xlwPfP