नवी दिल्ली : देशातील सर्व टेलिकॉम ऑपरेटर कायमच स्पॅम कॉल थांबविण्याच्या प्रयत्नात असतात. परंतु या सर्व प्रयत्नांना न जुमानता टेलिकॉमचे ग्राहक या स्पॅम कॉलमुळे त्रस्त आहेत. कधीकधी हे स्पॅम कॉल्स वापरकर्त्यांना फार अस्वस्थ करतात. परंतु असेही वेळा असतात जेव्हा आपण सामान्य व्हॉईस कॉलमुळे देखील अस्वस्थ होतो. यापासून सुटका मिळवायची ट्रिक अगदी सोपी आहे. तुम्ही देखील यामुळे ट्रस्ट असाल ती भन्नाट ट्रिक नक्की वापरून पहा. अनेकदा, गेम खेळत असताना, ओटीटी वर चित्रपट पाहताना किंवा मित्रांसोबत बाहेर असतांना फोन कॉल नको असतात. हेच कॉल्स कसे थांबवायचे त्याबद्धल हि माहिती. वाचा : फोनवर येणारा कॉल कसा थांबवायचा सर्वप्रथम आपल्या स्मार्टफोनच्या कॉल सेटिंग्जवर जाऊन कॉल फॉरवर्डिंग पर्यायावर क्लिक करा, तुम्हाला तीन पर्याय दिसतील. आल्वेज फॉरवर्ड, बीजी असताना फॉरवर्ड आणि अनअन्सार्ड असल्यास फॉरवर्ड असे पर्याय दिसतील. ऑल्वेज फॉरवर्ड पर्याय टॅप करा आणि बंद केलेला किंवा सुरु नसलेला नंबर प्रविष्ट करा. आता एनेबल वर टॅप करा. असे केल्याने आपल्या नंबरवर येणारे सर्व कॉल थांबतील. विशेष म्हणजे आपण कोणत्याही अडचणी शिवाय मोबाइल इंटरनेट वापरण्यास सक्षम असाल. फोनवर येणारा कॉल थांबविण्याचे इतर मार्ग : आपल्या स्मार्टफोनवरील सेटिंग्ज वर जाऊन डु नॉट डिस्टर्ब वर क्लिक करा, त्यानंतर पॉप-अप मेनूमधून कोणत्याही कॉलला परवानगी देऊ नका. आता पुन्हा पुन्हा कॉल करणार्यांना टॉगल करा. कॉल बॅरिंग पद्धत चा पर्याय देखील चांगला यासाठी, प्रथम फोन अॅपवर जा आणि स्क्रीनच्या सर्वात वर दिसणार्या तीन ठिपक्यांवर टॅप करा. नंतर सेटिंग्ज वर जाऊन कॉलवर टॅप करा. कॉल मेन्यूमधील कॉल बॅरिंग पर्यायावर क्लिक करा. आता सर्व इनकमिंग कॉल पर्यायावर टॅप करा आणि कॉल बॅरिंग संकेतशब्द प्रविष्ट करा. हा संकेतशब्द सहसा 0000 किंवा 1234 असतो. आता चालू करा वर टॅप करा. वाचा :
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h0sh91