Full Width(True/False)

'सासूशी बोलताना भीती वाटते' करिना कपूरनं सांगितला किस्सा

मुंबई: अभिनेता सैफ अली खानची पत्नी पटौदी कुटुंबाची सून आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सैफची आई आणि अभिनेत्री यांच्याबाबत करिना बोलली. यावेळी तिनं शर्मिला यांच्याबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. शर्मिला टागोर या बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रींपैकी एक असल्याचंही करिनानं यावेळी सांगितलं. करिनाचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे ज्यात ती आपल्या सासूबद्दल बोलताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये करिना सांगते की, तिला तिच्या सासूची खूप भीती वाटते. करिनानं सांगितलं की, 'त्यांना काहीही सांगायचं असेल तरीही मी घाबरते.' त्या या जगातल्या सर्वाधिक सुंदर महिलांपैकी एक आहेत असं करिनाचं म्हणणं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ करिनाच्या 'व्हॉट विमेन वॉन्ट' शोमधील आहे. करिना पुढे म्हणाली, 'मी खूपच नशीबवान आहे की, शर्मिला टागोर माझ्या सासू आहेत. मला त्यांच्यासारखी सासू मिळाली हे माझं भाग्यच आहे. शर्मिला फक्त त्यांच्या मुलांचीच नाही तर आपली नातवंड आणि सून यांचीही खूप काळजी घेतात. त्याच्यासोबत टाइम स्पेंड करण्यासाठी घरातले सर्वच खूप उत्सुक असतात. मी तर याची आतुरतेन वाट पाहत असते.' करिना आणि सैफ यांनी दोन गोंडस मुलं आहेत. करिना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. यावरून ते आपले फोटो, व्हिडीओ आणि आगामी चित्रपटांचे अपडेट शेअर करताना दिसते. करिनाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच आमिर खानच्या 'लाल सिंह चढ्ढा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याआधी तिनं आमिरसोबत '३ इडियट्स' आणि 'तालश' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय ती करण जोहरच्या तख्त चित्रपटातही दिसणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3wX37NM