Full Width(True/False)

प्रसिद्ध गायक बप्पी लहरी यांना करोनाची लागण, इस्पितळात दाखल

मुंबई- संपूर्ण देशभरात करोनाचं संक्रमण वाढताना दिसत आहे. अनेक राज्यात लॉकडाउनदेखील करण्यात आला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बॉलिवूडवर देखील करोनाचा प्रभाव दिसून येत आहे. बॉलिवूडप्रमाणेच मराठी सिनेसृष्टीमध्येही अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याच्या बातम्या कानावर येत आहेत. अशात आणखी एका दिग्गज गायकाला करोना झाल्याची माहिती मिळाली आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक, संगीतकार यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील ब्रीच कॅण्डी इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे. बप्पी यांनी १७ मार्च रोजी करोना लसीसाठी नाव नोंदणी केल्याचं सांगितलं होतं. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नाव नोंदणी प्रक्रिया अत्यंत सोपी असून ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन केलं होतं. तेदेखील लवकरच लसीकरण करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. परंतु, त्यापूर्वीच त्यांना करोनाची लक्षण दिसू लागल्याने त्यांनी कोविड- १९ चाचणी करून घेतली आणि ते करोना संक्रमित झाल्याचं कळलं. सध्या त्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आलं असून त्यांची तब्येत स्थिर आहे. बप्पी यांची मुलगी रीमा लहरी सध्या त्यांच्यासोबत इस्पितळात आहे. रीमाने पत्रकारांशी बोलताना वडिलांच्यी तब्येतीबद्दल माहिती दिली. ती म्हणाली, 'खूप काळजी घेऊनही बप्पी दा यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्या शरीरात करोनाची सौम्य लक्षण दिसत असून त्यांचे वय लक्षात घेता सावधगिरी म्हणून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे. ते लवकरच बरे होऊन घरी परततील. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यासाठी तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.' बप्पी लहरी आता ६८ वर्षाचे असून वयाच्या १९ व्या वर्षी ते मुंबईत आले होते. त्यांनी 'चलते चलते', 'जख्मी', 'शराबी', 'नमक हलाल', 'डांस डांस', 'डिस्को डांसर', 'थानेदार' आणि 'आंखें' यांसारख्या अनेक चित्रपटात संगीतकार म्हणून काम केलं आहे. याशिवाय त्यांनी अनेक हिट गाणी गायली आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Ptwc2t