नवी दिल्लीः स्मार्टफोनची दिग्गज कंपनी अॅपल आता iPhone 13 च्या लाँचिंगची तयारी करीत आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, iPhone 13 ला तीन मॉडलमध्ये कंपनी मार्केटमध्ये उतरवू शकते. या लिस्टमध्ये iPhone 13, आणि iPhone 13 Pro Maxचा समावेश आहे. रिपोर्ट्च्या माहितीनुसार, iPhone 13 ची लाँच होण्यात आता काही महिने उरले आहेत. परंतु, लाँचआधीच या स्मार्टफोनची फीचर्स, किंमत आणि अन्य काही डिटेल्स लीक झाली आहे. वाचाः iPhone 13 Pro चे फीचर्स iPhone 13 मॉडलची डिझाइन मध्ये काही किरकोळ बदल करू शकतात. तर बाकीची डिझाइन आयफोन १२ सारखी असू शकते. काही रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, iPhone 13 Pro सोबत छोटा नॉच पाहायला मिळू शकतो. याशिवाय, iPhone 13 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेटचा डिस्प्ले मिळू शकतो. iPhone 13 सीरीजच्या मोबाइल्समध्ये कॅमेरा मॉड्यूल म्हणून यात १२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर हून जास्त रियर कॅमेरा सेन्सर पाहायला मिळू शकतो. नवीन रिपोर्ट्समध्ये हेही सांगितले की, आयफोन १३ प्रो मध्ये कंपनी पोर्ट्रेट व्हिडिओ मोड देऊ शकते. यासोबतच अल्ट्रा वाइड लेन्स इंप्रूव्ह करू शकते. याआधी आलेल्या रिपोर्ट्समध्ये म्हटले होते की, आयफोन १३ मध्ये कंपनी अल्ट्रा वाइड लेन्स देऊ शकते. आयफोन १२ प्रमाणे यात अल्ट्रावाइड अँगल कॅमेरा दिला जाऊ शकतो. वाचाः iPhone 13 Pro मध्ये in-display fingerprint scanner आणि Face ID लॉक-अनलॉक सारखे फीचर्स मिळू शकते. अॅपलच्या अपकमिंग स्मार्टफोन Apple A15 SoC प्रोसेसर सोबत येतील तसेच iOS 15 ऑपरेटिंग सिस्टम वर बेस्ड होणार आहे. एका टिप्स्टरमध्ये आयफोन १३ सीरीज मध्ये युजर्सला ऑलवेज ऑन डिस्प्ले आणि चांगले ग्रिपसाठी रिफाइन्ड मॅट बॅक पॅनेल सारखे फीचर्स मिळू शकते. वाचाः iPhone 13 Pro ची लॉन्च डेट अॅपलने नुकत्याच २० एप्रिलला झालेल्या स्प्रिंग लोडेड इव्हेंट दरम्यान अनेक प्रोडक्ट्सला भारतात लाँच केलेले आहे. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, आयफोन १३ सीरीजला अॅपल सप्टेंबरच्या अखेरला लाँच करू शकते. दरम्यान, २०२० प्रमाणे चिप आणि अन्य कारणामुळे आयफोन १३ सीरीजच्या लाँचिंगमध्ये उशीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता हे पाहणे उचित ठरेल की, अधिकृतपणे हा फोन कधी लाँच होतो. वाचाः iPhone 13 Pro ची किंमत iPhone 13 Pro ला या वर्षाच्या अखेरपर्यंत लाँच होणारा अॅपलचा बेस्ट फोन असणार आहे. iPhone 13 Pro ची किंमत वरून बोलले जात आहे की, याची सुरुवातीची किंमत १ लाख १९ हजार रुपये असू शकते. वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tYrgBM