नवी दिल्लीः स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus ने नुकतीच OnePlus 9 सीरीज च्या स्मार्टफोनला लाँच केले आहे. हा फोन IP 68 रेटिंग प्रोटेक्शन सोबत येतो. म्हणजेच या फोनला वॉटर आणि डस्ट रेजिस्टेंट असते. याला पाणी आणि धुळ पासून सहज वापरता येते. याशिवाय, याची स्क्रीन कॉर्निंग गोरिला ग्लास प्रोटेक्शन सोबत येते त्यामुळे यावर कोणतेही स्क्रॅच पडत नाही. तसेच पडूनही तो तुटत नाही. वाचाः कंपनीने दावा करीत यूटूबवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. ज्यात स्मार्टफोनचे ड्यूरेबिलिटी अँड ड्रॉप टेस्ट करण्यात आली आहे. या व्हिडिओला Gupta Information Systems in हिंदी या नावाच्या एका यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आले आहे. ज्यात १ तासापर्यंत बर्फ मध्ये फ्रीज करून हे पाहिले आहे की फो चालतो की नाही. व्हिडिओत दिसतेय की, फोनला ११ तास ठेऊनही बाहेर काढल्यानंतर फोन व्यवस्थित चालला आहे. वाचाः चाकने स्क्रॅच केले, जमिनीवर आपटले या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, OnePlus 9 pro स्मार्टफोनला चाकूने स्क्रॅच केले. हा फोन कोणत्या मटेरियलने बनला आहे. याशिवाय या फोनला ८ वेळा वेगवेगळ्या उंचीवरून खाली आपटले. परंतु, या फोनला काहीच झाले नाही. व्हिडिओत हेही दाखवले की, वर या टेस्ट केल्या तर फोन तुटला होता. परंतु, OnePlus 9 pro पूर्णपणे चालू होता. या व्हिडिओला आतापर्यंत १.१० लाखांहून जास्त लोकांनी पाहिले आहे. तसेच ७.२ हजार लोकांनी याला लाइक केले आहे. वाचाः OnePlus 9 pro ची किंमत आणि फीचर्स OnePlus 9 Pro स्मार्टफोन च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या व्हेरियंटला तुमही ६४ हजार ९९९ रुपये आणि 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजच्या फोनला ९ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. या फोनला मॉर्निंग मिस्ट, पाइन ग्रीन आणि स्टेलर ब्लॅक कलर मध्ये खरेदी करू शकता. या फोनमध्ये ६.७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4500mAh ची बॅटरी आणि 65T फास्ट-चार्जिंग सपोर्ट दिला आहे. या फोनला कंपनीने Hasselblad सोबत मिळून बनवले आहे. याच्या रियरमध्ये ४८ मेगापिक्सलचा सेन्सर, ५० मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर, ८ मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मोनोक्रॉम सेन्सर दिला आहे. या फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/326O8D2