नवी दिल्लीः टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ Reliance Jio युजर्संना अनेक जबरदस्त पोस्टपेड प्लान ऑफर करीत आहे. या प्लानमध्ये २०० जीबी पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सोबत अनेक अतिरिक्त बेनिफिट् दिले जात आहे. जिओच्या या पोस्टपेड प्लान्सचे खास वैशिष्ट्ये म्हणजेच यात नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओचे फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा दिले जाते. जाणून घ्या जिओचे टॉप ३ पोस्टपेड प्लान संबंधी. वाचाः जिओचा ५९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान ५९९ रुयपे मंथली रेंटलच्या या प्लानमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० फ्री एसएमएस ऑफर करीत आहे. इंटरनेट युसेज साठी या प्लानमध्ये एकूण १०० जीबी डेटा ऑफर केला जात आहे. प्लानमध्ये २०० जीबी डेटा रोलओवर बेनिफिट सोबत येतो. प्लानमध्ये मिळणारे अतिरिक्त बेनिफिट्स मध्ये तुम्हाला नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः जिओचा ७९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान या प्लानमध्ये कंपनी एकूण १५० जीबी डेटा ऑफर करीत आहे. हा प्लान २०० जीबी डेटा रोलओवर बेनिफिट ऑफर करतो. प्लानच्या सब्सक्रायबर देशात कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेली १०० फ्री एसएमएस पाठवू शकता. प्लानमध्ये जिओ अॅप्सचे फ्री अॅक्सेस सोबत नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. वाचाः जिओचा ९९९ रुपयांचा पोस्टपेड प्लान या पोस्टपेड प्लानमध्ये कंपनी ५०० जीबी डेटा रोलओवर बेनिफिट सोबत एकूण २०० जीबी डेटा देत आहे. या फॅमिली प्लानमध्ये ३ अतिरिक्त सिम कार्डचा फायदा मिळतो. प्लानमध्ये रोज १०० फ्री एसएमएस सोबत अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट दिला जातो. बाकीच्या प्लान्सप्रमाणे नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि डिज्नी प्लस हॉटस्टार व्हीआयपीचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जात आहे. वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ODT5zS