Full Width(True/False)

फुलएचडी+ डिस्प्लेचा स्वस्त फोन Poco M2 Reloaded भारतात लाँच, किंमत ९,५०० रुपये

नवी दिल्लीः in India: हँडसेट निर्माता कंपनी पोकोने भारतातील ग्राहकांसाठी पोको एम २ चे नवीन व्हर्जन लाँच केले आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे या बजेट स्मार्टफोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप, 5000mAh ची दमदार बॅटरी आणि सर्वात खास बाब म्हणजे या बजेट फोनमध्ये फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. या लेटेस्ट Poco Mobile फोनची भारतातील किंमत आणि त्याची खास फीचर्स जाणून घ्या. वाचाः चे फीचर्स डिस्प्ले आणि सॉफ्टवेयरः या फोनध्ये कंपीने ६.५३ इंचाचा एचडी प्लस नव्हे तर फुल एचडी प्लस (2340 x 1080 पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. याचा आस्पेक्ट रेशियो 19.5:9 आहे. प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास ३ चा वापर केला आहे. लेटेस्ट पोको मोबाइल अँड्रॉयड १० वर काम करतो. या फोनमध्ये स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी ऑक्टा-कोर चा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम सोबत ६४ जीबीचे इंटरनल स्टोरेज दिले आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेजला ५१२ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. वाचाः पोकोच्या या स्मार्टफोनमध्ये बॅक पॅनेलवर क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. १३ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, सोबत ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा मायक्रो कॅमेरा, आणि २ मेगापिक्सचा डेप्थ सेन्सर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5000mAh ची दमदार बॅटरी दिली असून १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. या फोनला दोन कलर मध्ये Pitch Black आणि Slate Blue लाँच केले आहे. ४ जीबी रॅम प्लस ६४ जीबी स्टोरेजच्या फोनची भारतातील किंमत ९ हजार ४९९ रुपये ठेवली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3tGYPYX