Full Width(True/False)

Samsung Galaxy M42 5G लवकरच होणार लाँच, 6000mAh आणि स्नॅपड्रॅगन 750G मिळणार

नवी दिल्लीः Samsung लवकरच भारतात आपली नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करीत आहे. फोन संबंधी जी लेटेस्ट रिपोर्ट समोर आली आहे. यानुसार, बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंच वर स्पॉट करण्यात आला आहे. गीकबेंच लिस्टिंगमध्ये या अपकमिंग स्मार्टफोनसंबंधी खास फीचर्स दिले आहेत. गीकबेंच लिस्टिंग मध्ये हा फोन मॉडल नंबर SM-M426B ने लिस्ट आहे. फोनला सिंगल कोर टेस्ट मध्ये ६५० आणि मल्टी कोर टेस्ट मध्ये १७७९ गुण मिळाले आहेत. वाचाः गॅलेक्सी M42 5G चे फीचर्स या फोनमध्ये कंपनी स्लिम बेजल सोबत पंच होल डिझाइनचे डिस्प्ले दिले आहे. डिस्प्ले ६.६ इंचाचा असणार आहे. या फोनमध्ये 1080x2400 पिक्सल रेजॉलूशन ऑफर करणार आहे. या फोनमध्ये फुल एचडी प्लस रिझॉल्यूशन आणि अमोलेड स्क्रीन सोबत आस्पेक्ट रेशियो 20:9 आणि रिफ्रेश रेट 90Hz दिला आहे. वाचाः फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये कंपनी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप ऑफर करू शकते. यात एलईडी फ्लॅश सोबत ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा ऑफर केला जाऊ शकतो. वाचाः फोनला कमीत कमी ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोरेज सोबत आणले जाऊ शकते. प्रोसेसर म्हणून फोनमध्ये कंपनी स्नॅपड्रॅगन 750G 5G चिपसेट ऑफर करणार आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 6000mAh ची बॅटरी दिली आहे. या फोनला फास्ट चार्जिंग सपोर्ट करणार आहे. फोनमध्ये अँड्रॉयड ११ वर बेस्ड One UI 3.1 वर काम करणार आहे. या फोनची किंमत २० हजार रुपयांच्या जवळपास असू शकते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/39xLr1a