Full Width(True/False)

OnePlus 9 सीरीज मोबाइल्सनंतर येतोय फोन OnePlus Nord 2, पाहा फीचर्स

नवी दिल्लीः प्रीमियम स्मार्टफोन बनवणारी कंपनी वनप्लस ने नुकतीच फ्लॅगशीप OnePlus 9 Seriesचे स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. या सीरीजमध्ये OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro सोबत OnePlus 9R सारखे मोबाइल्स लाँच करण्यात आले होते. भारतासह अन्य देशात कंपनीचे सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोन आहे. वनप्लस नॉर्ड मोबाइलच्या यशानंतर आता कंपनी फोनचा सक्सेसर वनप्लस नॉर्ड २ लाँच करण्यात येणार आहे. वाचाः पहिल्यांदा मीडियाटेक प्रोसेसर ची इमेज लीक करण्यात आली आहे. ज्यात वनप्लस पुढील महिन्यात झलक सोबत खास फीचर्स दिसली आहेत. वनप्लस नॉर्ड २ पुढील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात लाँच केला जाणार आहे. वनप्लस नॉर्डचे अपग्रेडेड व्हर्जनला वनप्लस नॉर्ड एसईच्या रुपांत लाँच केले जाऊ शकते. परंतु पॉप्यूलर टिप्स्टर Max Jambor ने दावा केला आहे की, वनप्लसचा पुढील फोन वनप्लस नॉर्ड असणार आहे. ज्यात Dimensity 1200 5G प्रोसेसर सह अनेक जबरदस्त फीचर्स पाहायला मिळणार आहेत. पहिल्यांदा वनप्लसच्या फोनमध्ये मीडियाटेक चिपसेट पाहायला मिळणार आहे. या फोनला ३० हजार रुपयांच्या किंमतीच्या रेंज मध्ये लाँच केले जाऊ शकते. वाचाः संभावित फीचर्स OnePlus Nord 2 च्या लीक इमेजनुसार, या फोनमध्ये ६.४९ इंचाचा डिस्प्ले असणार आहे. याच्या लेफ्ट कॉर्नर स्कॅनर वर फ्रंट कॅमेरा साठी होल पंच कटआउट दिला आहे. या फोनच्या राइट साइडमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. वनप्लस नॉर्डची संभावित फीचर्स मध्ये Fluid AMOLED डिस्प्ले पाहायला मिळणार आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz असणार आहे. या फोनला १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या टॉप व्हेरियंट पर्यंत लाँच केले जाऊ शकते. वनप्लसच्या या अपकमिंग फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सरचा ट्रिपल रियर कॅमेरा पाहायला मिळू शकतो. तर या फोनमध्ये 4500 एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सोबत येणार आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3fthEdX