Full Width(True/False)

VIDEO: अनुष्कानं वामिकाला छातीशी घट्ट कवटाळलं आणि फोटोग्राफर्संकडे रागानं पाहिलं

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री नुकतीच मुंबई विमानताळावर स्पॉट झाली. अर्थात यावेळी ती एकटी नव्हती. तिची लेक वामिका आणि पती देखील सोबत होते.आयपीएलचे सामने सुरू असल्यानं विराटसोबत अनुष्का आणि वामिका देखील नेहमीच सोबत प्रवास करतात. मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वामिकाला प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय अनुष्का आणि विराटनं घेतला आहे. एअरपोर्टवर उपस्थित असलेले काही फोटोग्राफर्स फोटो क्लिक करत होते. पण हे काही अनुष्काला आवडलं नाही. तिनं फोटोग्राफर्संना पाहून वामिकाला आणखी घट्ट छातीशी कवटाळलं. इतकंच नाही तर ती फोटोग्राफर्संकडे रागात पाहाताना दिसत आहे. अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलीचा चेहरा दिसू यासाठी मुलीला आणखी किती लपवणार आहेस तिला, असं एकानं म्हटलं आहे, तर एकानं आता काय फोटोग्राफरचा जीव घेणार आहेका? असं म्हटलं आहे. अनुष्कानं ११ जानेवारीला वामिकाला जन्म दिला. परंतु तिला सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांपासून दूर ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे जिथं जातात तिथं योग्य ती खबरदारी ते घेत असतात. त्यांनी वामिकासोबतचे फोटो शेअर केले असले तरी त्यात तिचा चेहरा दिसत नाहीए. त्यामुळे चाहत्यांमध्ये वामिकाला पाहण्याची उत्सुकता आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3n3CTEW