Full Width(True/False)

Video- एअरपोर्टवर चाहत्याचं वागणं पाहून भडकली सारा अली खान

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री नुकतीच आई अमृता सिंह आणि भाऊ इब्राहिम अली खान यांच्यासोबत मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली. सारा तिच्या फॅमिलीसोबत मालदीववरून परतली. जशी सारा एअरपोर्टवर दिसली तसं तिला फोटोग्राफर्सनी घेरलं आणि फोटो क्लिक करू लागले. त्याच वेळी एका चाहत्यानं असं काही केलं की, नेहमीच कूल असणारी सारा अली खान या चाहत्यावर भडकली. साराचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. मुंबई एअरपोर्टवर सारा अली खानला फोटोग्राफर्ससोबत काही चाहत्यांनीही घेरलं होतं. पण त्यावेळी एका चाहत्याच्या वागण्याचा साराला राग आला आणि तिनं त्याला चांगलंच सुनावलं. साराला पाहताच एक चाहता तिच्याकडे सेल्फी घेण्यासाठी आला होता. पण यावेळी त्यानं मास्क खाली करून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला आणि हे पाहिल्यावर सारा त्याच्यावर भडकली आणि म्हणाली, 'काय करत आहात तुम्ही, सध्या करोनाच्या काळात सोशल डिस्टंसिंग गरजेचं असताना तुम्ही अशाप्रकारे कसं काय वागू शकता.' सारा अली खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यावर तिच्या अनेक चाहत्यांच्या कमेंट करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये एक शालेय वयाचा मुलगा साराला पाहताच आपला मास्क काढून तिच्यासोबत सेल्फी क्लिक करताना दिसत आहे. त्यावेळी सारा त्याला थांबवताना दिसते. त्यानंतर ती फोटोग्राफर्सना सुद्धा स्वतःची काळजी घेण्यासाठी सांगत निघून जाते. साराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर ती शेवटची डेव्हिड धवन दिग्दर्शित 'कुली नंबर १'च्या रिमेकमध्ये दिसली होती. या चित्रपटात तिनं अभिनेता वरुण धवनसोबत स्क्रिन शेअर केली होती. याशिवाय लवकरच ती अभिनेता अक्षय कुमार आणि दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष यांच्यासोबत 'अतरंगी रे' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग काही दिवसांपूर्वीच संपलं असून आनंद एल राय या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aTx1t8