Full Width(True/False)

भावाच्या प्रॉपर्टीसाठी रणधीर- रिमा शोधत आहेत घटस्फोटाचे पेपर!

मुंबई : देशामध्ये करोनाची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरली आहे. करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून देशातील वैद्यकीय यंत्रणेवर त्याचा ताण पडत आहे. या संकटकाळात देशातील अनेक संवेदनशील नागरिक मदतीसाठी पुढे आले असून प्रत्येकजण आपापल्यापरिने मदत करत आहे. यामध्ये कलाकारांचाही सहभाग मोलाचा आहे. या मदतीमध्ये कन्नड अभिनेता अर्जुन गौडानेही मदतीचा हात दिला असून प्रोजेक्ट स्माइल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून तो ही मदत करत आहे. अर्जुन चालवतो रुग्णवाहिका अनेक हिट सिनेमांमध्ये काम करून लोकप्रियता मिळवलेला हा अभिनेता आपला स्टारडम बाजूला ठेवून करोनाच्या संकटकाळामध्ये लोकांच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. अर्जुनच्या या संस्थेच्या माध्यमातून लोकांना हॉस्पिटलमध्ये नेणे-आणणे, करोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची पार्थीव स्मशानात नेणे आणि त्यांच्या अंत्यविधींसाठी मदत करण्याचे काम केले जाते. विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये अर्जुन स्वतःही काम करत असून तो रुग्णवाहिका चालवण्याचे काम करत आहे. गरजूंना मदत करण्याचे ध्येय्य देशातील सध्याच्या परिस्थितीवर अर्जुन म्हणाला ,'देशामध्ये करोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका अनेक कुटुंबांना, नागरिकांना बसला आहे. अशा गरजू कुटुंबांना संस्थेतर्फे मदत केली जात आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही दिवसांमध्ये अर्धा डझनहून अधिक करोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांवर अंत्यसंस्कार आम्ही संस्थेतर्फे केले आहेत. खरोखरच गरजू असलेल्या लोकांना मदत करण्याचे आमचे ध्येय्य आहे.' 'हे काम करत असताना ज्या व्यक्तीला मदत केली जात आहे ती कुठून आली आहे, तिचा धर्म काय आहे याचा विचार आम्ही करत नाही. ज्यांना गरज आहे अशा लोकांना शक्य तेवढी मदत आम्ही करत आहोत. यासाठी मी स्वतः ठिकठिकाणी फिरत आहे.' अर्जुन आणि त्याचे सहकारी करत असलेल्या कामाबद्दल त्याचे भरभरून कौतुक होत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3e3EUOl