मुंबई : तुम्हाला माहिती आहे का अनुष्का शर्माने सुपरहिट सिनेमा थ्री इडियट्ससाठी ऑडिशन दिली होती ते? अगदी बरोबर ऐकले तुम्ही. २००९ मध्ये रिलीज झालेल्या यांनी दिग्दर्शित केलेल्या '' सिनेमासाठी अनुष्का शर्माने ऑडिशन दिली होती. त्या ऑडिशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राजकुमार हिरानी यांच्याच 'मुन्नाभाई एमबीबीएस' या २००३ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमातील डायलॉग बोलताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा ग्रेसी सिंहचा डायलॉग बोलताना दिसत आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी अनुष्काला ' 3 इडियट्स' सिनेमासाठी आपल्या या जुन्या सिनेमातील डायलॉग दिला होता. या व्हिडीओमध्ये अनुष्का शर्मा हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली आहे. अर्थात या सिनेमात अनुष्काची निवड झाली नाही. ही भूमिका करिना कपूरने साकारली. या सिनेमात मध्यवर्ती भूमिकेमध्ये , आर. माधवन आणि शर्मन जोशी होते. त्यानंतर २००९ मध्ये अनुष्का शर्माने शाहरुख खानसोबत 'रब ने बना दी जोडी' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. राजकुमार हिरानी यांच्यासोबत काम करण्याची संधी अनुष्काला या नंतर पाच वर्षांनी मिळाली आणि हा सिनेमा होता 'पीके' या सिनेमात अनुष्का शर्मासोबत आमिर खान आणि सुशांत सिंह राजपूत होते. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान यशस्वी झाला होता. हा सिनेमा त्याच्या वेगळ्या कथनाकासाठी प्रेक्षकांना आवडला. तसाच या सिनेमात अनुष्का शर्मा, आमिर खान आणि सुशांत सिंह यांच्या अभिनयासाठीही गाजला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RfmnWl