Full Width(True/False)

WhatsApp व्हिडिओ स्टेटसला सहज करा डाउनलोड, थर्ड पार्टी अॅपची गरज नाही

नवी दिल्लीः इंस्टंट मेसेजिंग अॅप यूजर्स लोकांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. जर कोणाला काही माहिती द्यायची असेल तर आपण सहज म्हणतो मी व्हॉट्सअप करतो. व्हॉट्सअप सध्या प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये आहे. अनेक कामांसाठी यावर अवलंबून राहावे लागत आहे. आता व्हॉट्सअॅपने पेमेंटला सुद्धा आपल्या प्लॅटफॉर्मवर आणले आहे. पेमेंट करण्यासाठी दुसरीकडे जावे लागत नाही. व्हॉट्सअॅप द्वारे काही देवाण-घेवाण करण्यासाठी या ठिकाणी होते. वाचाः WhatsApp ने अनेक फीचर्स आणले आहेत. यात एक फीचर हे WhatsApp स्टेट्स आहे. या फीचर संबंधी जास्त सांगण्याची गरज नाही. कारण, आज प्रत्येक जण जाणून आहे. कारण, एक अशी वस्तू आहे ज्यासंबंधी तुम्ही कंफ्यूजन असणार किंवा त्यासंबंधी जाणत नसाल. ते म्हणजे WhatsApp स्टेटस डाउनलोड कसे करावे. WhatsApp स्टेट्स कसे लावावे हे आपण सर्व जण जाणतो, परंतु, त्याला डाउनलोड कसे करावे हे आपल्यापैकी अनेकांना माहिती नसते. WhatsApp स्टेट्सला डाउनलोड करण्यासाठी कोणताही ऑप्शन दिसत नाही. त्यामुळे मित्राचा स्टेट्स पैकी इमेज किंवा व्हिडिओ आपल्याला हवा असेल तर त्यांना मागावा लागतो. परंतु, एक पद्धत आहे. त्याद्वारे तुम्ही WhatsApp स्टेट्सला डाउनलोड करू शकता. वाचाः WhatsApp स्टेट्सला डाउनलोड करण्यासाठी थर्ड पार्टीचा मदत घ्यावी लागते. परंतु या अॅप्सविना WhatsApp स्टेट्स व्हिडिओ डाउनलोड करू शकता. व्हिडिओ स्टेट्सला तुम्ही आयफोन आणि अँड्रॉयड दोन्ही स्मार्टफोन्स वरून डाउनलोड करू शकता. अँड्रॉयड युजर्ससाठी व्हिडिओ डाउनलोड करण्याची पद्धत सांगत आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः असा डाउनलोड करा WhatsApp व्हिडिओ स्टेट्स यासाठी तुम्हाला सर्वात आधी स्टेट्सला ओपन करावे लागेल. ज्याला तुम्ही डाउनलोड करायचे आहे. यानंतर फोनच्या फाइल मॅनेजर मध्ये जा. हे प्रत्येक फोनमध्ये इनबिल्ट असतात. जर तुमच्या फोनमध्ये हे नसेल तर गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाउनलोड करा. फाइल मॅनेजरच्या सेटिंगमध्ये जा. मग Show Hidden System Files सेटिंगला ऑन करा. मग पुन्हा फाइल मॅनेजरच्या होम पेजवर या. या ठिकाणी फोनची इंटरनल मेमरीचा पर्याय तुम्हाला दिसेल. यावर जा. मग WhatsApp फोल्डरच्या मीडिया फोल्डरला ओपन करा. या ठिकाणी तुम्हाला स्टेस्ट फोल्डर दिसेल. यात सर्व WhatsApp स्टेट्स दिसतील. ज्याला तुम्हाला डाउनलोड करायचे आहे. त्याला सिलेक्ट करून कॉपी करा. आणि इंटरनल स्टोरेज मध्ये पेस्ट करा. यानंतर स्टेट्सला तुम्ही कुणालाही सेंड करू शकता. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3rNCeIz