Full Width(True/False)

दीपिकाला पिरियड्सच्या वेदना असह्य, शोएबनं केला स्वयंपाक

मुंबई: अभिनेता आणि अभिनेत्री हे टीव्ही जगतातलं क्यूट कपल म्हणून ओळखलं जातं. शोएब आणि दीपिका नेहमीच एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसतात. या फोटोंमध्ये अनेकदा त्यांच्या दैनंदिन जीवनातील गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि यात शोएब नेहमीच दीपिकाची काळजी घेताना दिसतो. शोएबनं त्याच्या युट्यूब चॅनेलवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तो पत्नी दीपिकासाठी स्वयंपाक करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शोएबनं चाहत्यांना एक खास संदेश सुद्धा दिला आहे. या व्हिडीओमध्ये शोएबनं महिलांच्या पिरियड्सबद्दल भाष्य केलं आहे. महिलांना या दिवसांमध्ये किती वेदना होतात आणि यावेळी त्यांची काळजी कशी घ्यावी याविषयी सांगितलं आहे. शोएबचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. शोएबनं या व्हिडीओमध्ये सांगितलं आहे, 'आपल्या समाजात, कुटुंबात या विषयावर बोलणं अनेकदा टाळलं जातं. अनेकदा याबाबत सर्वांची संकोचित भूमिका असते. पण आता वेळ आली आहे की, यावर आपण खुलेपणानं बोलायला हवं. जेव्हा या दिवसांमध्ये महिलांना वेदना होत असतात. तेव्हा त्यांची थोडी जास्त काळजी घ्यायला हवी.' शोएबसोबत या व्हिडीओमध्ये दीपिका सुद्धा दिसत आहे. या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून नेहमीच काळजी घेतल्याबद्दल तिनं शोएबचे आभार मानले आहेत. दीपिका आणि शोएबच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर लवकरच या दोघांचं 'प्यार दुवाँ' हे गाणं रिलीज होणार आहे. ज्याची चाहत्यांना बऱ्याच काळापासून उत्सुकता आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/36yNEIr