Full Width(True/False)

200 Mbps स्पीडचे ब्रॉडबँड प्लान, किंमत ८४९ रुपयांपासून सुरू, OTT सब्सक्रिप्शन फ्री

नवी दिल्लीः देशात करोनाच्या केसेस वाढत आहेत. त्यामुळे घरी बसलेल्या लोकांना जास्त डेटाची गरज पडत आहे. अनेक लोकांना आता ब्रॉडबँड प्लानची गरज भासू लागली आहे. त्यामुळे कोणता ब्रॉडबँड प्लान तुमच्यासाठी योग्य आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला एअरटेलची २०० एमबीपीएस प्लान्ससंबंधी माहिती देत आहोत. वाचाः चे 200 Mbps च्या प्लानसाठी तुम्हाला ९९९ रुपये महिना द्यावा लागणार आहे. याचाच अर्थ एक महिन्याच्या इंटरनेटसाठी तुम्हाला ९९९ रुपये मोजावे लागतील. यात तुम्हाला २०० एमबीपीएस इंटरनेट स्पीड मिळते. या प्लानमध्ये ३ महिने, ६ महिने आणि १२ महिन्याची वैधता मिळते. ३ महिन्याच्या प्लानवर युजर्संना ९९९ रुपये प्रति महिना द्यावे लागते. याचा अर्थ २९९७ रुपयांचे पेमेंट करावे लागते. जर एकदा तीन महिन्याचा प्लान घेत असाल तर तुम्हाला ९९९ रुपये महिना पैसे द्यावे लागतात. ६ महिन्याचा प्लान घेतल्यास याची किंमत आणखी कमी होते. एकाच वेळेला ६ महिन्याचा Airtel Xstream Fiber प्लान घेतल्यास तुम्हाला महिन्याला फक्त ९२४ रुपये द्यावे लागतील. यासाठी तुम्हाल एकाच वेळेला ५५४४ रुपयांचा पेमेंट करावा लागतो. वाचाः या प्लानला जर तुम्ही १२ महिन्यासाठी घेतले तर याची किंमत आणखी कमी होते. १२ महिन्याचा प्लान एकदा घेतल्यास यासाठी तुम्हाला महिन्याला ८४९ रुपये द्यावे लागतात. म्हणजेच तुम्हाला एकाच वेळेला १० हजार १८८ रुपयांचे पेमेंट करावे लागते. या सर्व किंमतीत टॅक्सचा समावेश करण्यात आला नाही. तीन महिने किंवा त्यापेक्षा अधिक वैधता असलेल्या प्लान्सवर कंपनी फ्री इंस्टॉलेशन ऑफर करते. एका महिन्याच्या प्लानवर युजर्संना इंस्टॉलेशन चार्ज सुद्धा द्यावे लागू शकतात. कंपनी ड्युअल बँड राउटर कनेक्शनसोबत फ्री मध्ये ऑफर करते. या प्लान्सच्या एफयूपी लिमिट ३३३३ जीबी प्रति महिना आहे. या प्लान्ससोबत ओटीटी बेनिफिट्स दिले आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3h0bl2o