Full Width(True/False)

स्वस्त किंमतीतील टॉप-५ 5G स्मार्टफोन्स, पाहा किंमत- फिचर्स

नवी दिल्ली. सरकारने 5G ला परवानगी दिल्यानंतरच याबाबत चर्चा अधिक वाढली आहे. बरेच लोक या स्मार्टफोन्स बद्दल अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे आणि ५ जी स्मार्टफोनमध्ये विशेष रस दाखवत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच ५ जी स्मार्टफोनबद्दल सांगणार आहोत ज्याची किंमत १५ हजारांपेक्षा कमी आहे आणि फीचर्स देखील मस्त आहे. वाचा : रिअलमी ८ ५जी रिअलमी ८ ५जीची किंमत १४,९९९ रुपये आहे, यात तुम्हाला डायमेन्सिटी ७०० प्रोसेसर आणि १०८० पिक्सल डिस्प्ले मिळेल. याशिवाय यात ५००० एमएएच बॅटरी आणि ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे. हे ड्युअल नॅनो सिम कार्ड पर्यायासह उपलब्ध आहे. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर रियरमध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, २ मेगापिक्सलचा मोनोक्रोम कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा मिळतो. तर सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन अँड्राइड ११ वर आधारित रिअलमी यूआय २.० वर चालतो. रियलमी नरझो ३० प्रो ५ जी रियलमी नरझो 30 प्रो 5 जी मध्ये तुम्हाला डायमेन्सिटी ८०० यू चिपसेट आणि ५००० एमएएच बॅटरी मिळेल. याचे डिस्प्ले ६.५ इंच असून यात ८ जीबी रॅम आहे. याची किंमत १५,९९९ रुपये आहे. ओपीपीओ ए ७४ ५ जी ओपीपीओ ए ७४ ५ जी हा एक चांगला पर्याय आहे. यात तुम्हाला मीडियाटेक डायमेन्सिटी ७२० ऑक्टा-कोर चिपसेट मिळेल जो ८ जीबी रॅमसह समर्थित आहे. या फोनची अंतर्गत मेमरी १२८ जीबी आहे, जी २५६ जीबीपर्यंत वाढविली जाऊ शकते. त्याची किंमत १७,९९९ रुपये आहे. मोटो जी ६० मोटो जी ६० हा १०८ -मेगापिक्सलचा कॅमेरा असलेला मोटोरोलाचा पहिला स्मार्टफोन आहे. यात तुम्हाला६ जीबी रॅम,१२८ जीबी स्टोरेज आणि ५००० एमएएच बॅटरी मिळेल. या फोनची किंमत १७,९९९ रुपये आहे. Realme X७ ५G Realme X7 ५G ची किंमत १७,९९९ रुपये आहे आणि मीडियाटेक डायमेन्सिटी ८०० यू प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. या ड्युअल सिम स्मार्टफोनमध्ये ६.४ इंच डिसप्ले आणि ४३१० एमएएच बॅटरी आहे. याशिवाय यात ६ जीबी रॅम आणि ६४ एमपी + ८ एमपी + २ एमपी ट्रिपल रीअर कॅमेरा आणि १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vhsfxJ